Lokmat Sakhi >Social Viral > मॅटर्निटी लिव्हवर असतानाच पुन्हा गरोदर राहिली म्हणून कंपनीने कामावरुन काढलं, वाचा हे अजब प्रकरण

मॅटर्निटी लिव्हवर असतानाच पुन्हा गरोदर राहिली म्हणून कंपनीने कामावरुन काढलं, वाचा हे अजब प्रकरण

Boss sacks woman for getting pregnant during maternity leave : भरपाई म्हणून तिला २८ हजार ७०६ पौंड देण्याचा आदेश कोर्टाने कंपनीला दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 04:36 PM2024-10-24T16:36:03+5:302024-10-24T16:44:33+5:30

Boss sacks woman for getting pregnant during maternity leave : भरपाई म्हणून तिला २८ हजार ७०६ पौंड देण्याचा आदेश कोर्टाने कंपनीला दिला.

Boss sacks woman for getting pregnant during maternity leave : The company fired her for getting pregnant again while on maternity leave, read this strange case | मॅटर्निटी लिव्हवर असतानाच पुन्हा गरोदर राहिली म्हणून कंपनीने कामावरुन काढलं, वाचा हे अजब प्रकरण

मॅटर्निटी लिव्हवर असतानाच पुन्हा गरोदर राहिली म्हणून कंपनीने कामावरुन काढलं, वाचा हे अजब प्रकरण

गर्भवती महिलांना बाळंतपणाची सुट्टी मिळणे हा जगभरात पाळला जाणारा नियम आहे. पण ब्रिटनमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इथे चक्क एका महिलेला गर्भवती राहिली म्हणून कामावरून काढून टाकले. यामुळे त्या कंपनील रोजगार न्यायाधिकार अंतर्गत तब्बल २८ हजार पौंडचा फटका बसला आहे. आता असे काय झाले की कंपनीला इतका दंड भरावा लागला. तर पाहूया हे प्रकरण नेमकं काय आहे (Boss sacks woman for getting pregnant during maternity leave).
 
निकिता ट्विचेन ही २७ वर्षीय महिला आपल्या बाळाच्या जन्मासाठी घेतलेली प्रसूती रजा संपवून पुन्हा कामावर रुजू होण्याच्या तयारीत होती. पण त्याच काळात तिला समजले की ती पुन्हा गर्भवती राहिली आहे. डेली मेल च्या वृत्तनुसार या कारणामुळे ती कामावर रुजू होण्याधीच तिच्या व्यवस्थापकीय संचालक जेरेमी मॉर्गन यांनी तिला कामावरून काढून टाकले. ही महिला पुन्हा ३६ आठवड्यांची प्रसूती रजा घेईल या भितीपोटी संचालकांनी तिला कामावरुन कमी केले. 

प्रसूती रजा संपत आली असतानाच राहिली गर्भवती

(Image : Google)
(Image : Google)

म्हणून निकिता २०२१ पासून कार्यालय प्रशासन सहाय्यक म्हणून कार्यरत होती. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे गर्भवती असतानाही तिला नाईलाजस्तव स्वच्छतेचे काम करावे लागत होते. यानंतर तिने कंपनीची रोजगार न्यायाधिकारमध्ये तक्रार केली. तिचे निलंबन चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा तिने इथे केला. ज्यावर न्यायमूर्तीनींही तिचे निलंबन अयोग्य असल्याचे संगितले. 
निकिता व तिचे वरिष्ठ जेरेमी यांच्यातील कार्यालयीन संबंध चांगले होते. रजेवरून परतण्यासंदर्भात तिची व वरिष्ठांची एक बैठक झाली होती. जी सकारात्मक होती, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ती कामावर रुजू होण्याची कंपनी वाट बघत असल्याचे यामध्ये म्हटले होते. मीटिंगमध्ये शेवटी निकीताने आपण गर्भवती असल्याचे सांगितले. त्यावेळी ती फक्त ८ आठवड्यांची गर्भवती होती. हे ऐकून तिच्या वरिष्ठांना धक्का बसला. 

वृत्तानुसार त्या महिलेने संगितले की मार्च २०२२ मध्ये जेव्हा तिची रजा संपत आली तेव्हा तिने पुन्हा रुजू होण्यासंदर्भात कंपनीने कोणतीही चर्चा केली नाही. तिने ३ एप्रिलला कामावर रुजू होणं अपेक्षित होतं पण तिला आपल्या बॉसला यासंदर्भात विचारावं लागलं. तसा तिने संदेश पाठवल्यावर जोवर तुम्ही तुमची दिनचर्या नक्की ठरवत नाही तोपर्यंत काम सोडणेच योग्य राहील’, असे उत्तर मिळाले. तिने संपर्क केल्यानंतर तिला सांगण्यात आले की काही आर्थिक कारणांनी तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. नंतर सांगण्यात आले की नवे सॉफ्टवेअर लावण्यात आले आहे ज्यामुळे तिची गरज नाही.नंतर या महिलेने दुसरीकडे नोकरी करण्यास सुरुवात केली.

कंपनीवर लावण्यात आलेले आरोप 

(Image : Google)
(Image : Google)

 
न्यायमूर्ती म्हणाले की, महिलेला रोज एकीकडून ४५ मिनिटांचा प्रवास करून स्वच्छतेच्या कामासाठी जावे लागते. घरच्या बेताच्या आर्थिक परिसस्थितीमुळे हे काम ती ३९ आठवड्यांची गर्भवती असेपर्यंत करत होती. जेरेमी मॉर्गन यांच्या संवादात विसंगती दाखवत कोर्टाने संगितले की फेब्रुवारीच्या बैठकीत कोणताही वित्तीय मुद्दा नव्हता. सगळं छान चालू असल्याचे सांगितले होते. शिवाय नंतर देण्यात आलेल्या नव्या सॉफ्टवेअरच्या मुद्द्याविषयी कोणतेही पुरावे सादर न केल्याने कोर्टाने त्यांची कान उघडणी केली. कोर्टाने निकिता ट्विचेन यांच्या बाजूने निकाल देत संगितले की ती गर्भवती असल्याने तिला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. ज्यामुळे तिला नाजुक काळात अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. याची भरपाई म्हणून तिला २८ हजार ७०६ पौंड देण्याचा आदेश कोर्टाने कंपनीला दिला.

Web Title: Boss sacks woman for getting pregnant during maternity leave : The company fired her for getting pregnant again while on maternity leave, read this strange case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.