माणसाला परिस्थिती कमी वयात खूप काही शिकवते, अनुभव व परिस्थितीच्या जोरावर आपण मोठे होतो. असाच एक प्रत्येय चीन या देशात दिसून आला आहे. एक १३ वर्षांची मुलगी व तिचा ५ वर्षांचा भाऊ, आपल्या पोलिओग्रस्त आईला मदत करण्यासाठी आईस्क्रीम विकत आहेत. आईस्क्रीम विकून आर्थिकरित्या आपल्या घरासाठी घडपड करीत आहेत. त्यांची ही आईसाठी तळमळ पाहून, नेटकऱ्यांनी त्या चिमुकल्यांचे कौतुक केले आहे. सध्या त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
चीनमधील हनान प्रांतातील चिमुकल्यांनी, आपल्या घरापासून तीन किलोमीटर सायकल चालवून पर्यटन स्थळ गाठले. या ठिकाणी त्यांनी तीन दिवसात एक हजार आईस्क्रीमची विक्री केली. हा सगळा खटाटोप त्यांनी आपल्या आईच्या औषध - पाण्यासाठी केलं असल्याचं सांगितलं. हे चिमुकले आईस्क्रिम विकून आपल्या कुटुंबाला आर्थिकरित्या मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांच्या या कहाणीने तिथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनाला स्पर्श केलं आहे(Boy, 5, and teen sister sell more than 1,000 ice lollies to Chinese tourists during May Day holidays to help sick mother and earn enough to pay school fees).
नव्या झाडूमधून फार भुसा पडतो, घरभर पसरतो? २ टिप्स, नवा झाडू घेतला की नक्की वापरा..
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, भावंडांच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून आले की, ते विकत असलेले आईस्क्रीम खूप स्वस्त होते. त्यांनी ही खटाटोप आपल्या आईला वाचवण्यासाठी केले. मुलांच्या आईला लहानपणापासून पोलिओ झाला होता, व ती या आधी रस्त्यावर आईस्क्रीम आणि स्नॅक्स विकायची. मध्यंतरी त्यांची तब्येत खूप खराब झाली, व त्यांना तातडीने रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यांचं नाव कुई असल्याची माहिती आहे.
चिप्सच्या पाकिटात हवा का भरलेली असते? चिप्स कमी, हवा जास्त...
याबाबतीत कुई सांगतात, ''माझ्या दोन मुलांनी माझी खूप मदत केली. त्यांनी माझा स्टॉल सांभाळला. मे डेच्या सुट्टीच्या पहिल्या दिवशी त्यांनी ३०० पेक्षा जास्त आईस्क्रीम विकल्या, दुसऱ्या दिवशी २०० आणि तिसर्या दिवशी ४०० पेक्षा जास्त आईस्क्रीम विकल्या. यातून त्यांनी आपल्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे कमावले आहेत.''
आईसाठी मुलांचे हे काम पाहून चिनी सोशल मीडियावर नेटकरी भावूक झालेत. एका यूजरने लिहिले की, ''गरीब कुटुंबातील मुले अनुभवातून पटकन मोठी होतात''. तर दुसऱ्याने, ''या दोन मेहनती आणि हुशार मुलांना माझा सलाम.'' असे म्हटले आहे. सध्या या दोन चिमुकल्यांवर सोशल मिडीयावर कौतुकाचं वर्षाव होत आहे.