सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डईनवर दिल्ली मेट्रो साफ करत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा तरूण खाली सांडलेलं जेवण अगदी शांततेनं उचलून फरशी साफ करत होता. ही पोस्ट सोशल मीडिया युजर्सचं मन जिंकत आहे.आता व्हायरल झालेली पोस्ट लिंक्डइनवर आशु सिंग नावाच्या युजरने शेअर केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या मुलाच्या संस्कारांचं कौतुक केलं जात आहे. (Boy cleans up after spilling food in delhi metro see viral post)
त्यात एका अनोळखी मुलाचे दिल्ली मेट्रोचा फ्लोअर साफ करतानाचे दोन फोटो होते. पोस्टनुसार, मुलगा पिशवीतून पाण्याची बाटली काढत असताना एक टिफिन बॉक्स जमिनीवर पडला आणि जेवण खाली सांडले. आधी वहीचं पानं फाडलं त्यानंतर रुमालानं फरशी स्वच्छ केली. "#DelhiMetro मध्ये एक तरुण मुलगा, जो प्लग इयरफोन्स घेऊन बसला होता.
पोट साफ होत नाही, गॅसेसचा त्रास वाढलाय? रोज ५ पदार्थ खा; पचन सुधारेल पटकन
त्याच्या पिशवीतून पाण्याची बाटली काढत असताना त्याचा टिफिन बॉक्स पडला आणि त्याचे सर्व जेवण जमिनीवर सांडले. त्या मुलाने त्याच्या एका नोटबुकमधून एक पान फाडले आणि फरशीवरून सर्व अन्न उचलले. मग त्याने आपला रुमाल घेतला आणि फरशी स्वच्छ पुसली,'' असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.