प्रेम आंधळं असतं...आणि प्रेमात माणूस कोणत्याही थराला जातो...या गोष्टी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत आणि हे खरंही आहे. पण, प्रेमात पडलेला माणूसही विचित्र गोष्टी करतो, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने हे सिद्ध केले आहे. हा व्हिडिओ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा आहे. नदीच्या काठावर शांत ठिकाणी बसून एक तरुण आपल्या प्रेयसीच्या डोक्यातील उवा काढत आहे.(Boyfriend removing louse from girlfriend head internet says no one can love like this)
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कुणाला ते गचाळ वाटलं तर कुणाला हसू आलं. कुणी प्रेमाचं हे रुप पाहून आपलं डोकं खाजवलं.
एक मुलगा आणि मुलगी बाजूला बसले आहेत हे दृश्य पाहून दोघेही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच असणार हे स्पष्ट होते. व्हिडिओत लक्ष दिल्यास एक मुलगा मुलीच्या डोक्यावरून उवा काढताना दिसतोय. तो हे काम अतिशय काळजीपूर्वक करत आहे आणि मुलगीही शांत बसली आहे. प्रेमानं, मन लावून अगदी तल्लीन होऊन तरुण उवा मारतोय.
बेकरीत शिरलेल्या चोराला तिनं साफसफाईच्या फडक्यानंच चोपचोप चोपलं; पाहा व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक खूप एन्जॉय करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक खूप मजेदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - प्रेमी उवा शोधतोय, दुसऱ्याने लिहिले - मला असाच खूप काळजी घेणारा बॉयफ्रेंड हवा आहे. कुणाकुणाला मात्र हे सगळं अत्यंत घाणेरडं, गचाळ वाटलं आहे. हेअर केअरची गरज आहे, ते काही उगीच नाही.