लग्नादरम्यान टिपलेले सुंदर क्षण सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच पसंत केले जातात. लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. वैवाहिक जीवनातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे पाठवणीचा. लग्नात सगळं सुखात पार पडलं की निरोपाच्या वेळी संपूर्ण घराचं वातावरण बदलून जातं. लग्नानंतर मुलगी कायमची घरच्यांना सोडून जाते. यावेळी कुटुंबातील सदस्य भावनिक होतात.
दरम्यान, एका वधूचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विदाईपूर्वीचा आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही भावूक व्हाल. आजी आपल्या नातीला पाहून रडायला लागते. पण रडण्याऐवजी नवरी तिला शांत करू लागते. ती दूर जात नाही असे सांगून वधू आजीचं सांत्वन करते. माझे सासरचे घर १० किमी अंतरावर आहे. तू म्हणशील तेव्हा मी येईन.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ
सोशल मीडियावर लोक या व्हिडिओलवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नूरियत_मुआ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (इन्स्टाग्राम रील) अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुम्ही तुमच्या आजीवर प्रेम करत असाल तर प्रेमाचा वर्षाव करा'. इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडिओवर (Instagram Reels Video) आपली प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले की, 'माझ्याकडे अशी प्रेमळ आजी असायला हवी होती.