मृत्यूच्या 30 वर्षांनंतर, शोभा आणि चंदप्पा यांचा गुरुवारी कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात पारंपारिक विवाह सोहळ्यात विवाह झाला. हे सामान्य लग्न नव्हते, तर ते 'प्रेथा कल्याणम' किंवा 'मॅरेज ऑफ द डेड' होते. 'प्रेथा कल्याणम' ही परंपरा आहे, ज्याचे पालन कर्नाटक आणि केरळच्या काही भागांमध्ये अजूनही केले जाते, जिथे जन्मादरम्यान मृत्यू झालेल्या लोकांसाठी विवाह विधी केले जातात. येथील समुदाय हा त्यांच्या आत्म्याचा सन्मान करण्याचा मार्ग मानतो. (Bride and groom died 30 years ago now they got married last night in mangalore)
I reached a bit late and missed the procession. Marriage function already started. First groom brings the 'Dhare Saree' which should be worn by the bride. They also give enough time for the bride to get dressed! pic.twitter.com/KqHuKhmqnj
— AnnyArun (@anny_arun) July 28, 2022
यूट्यूबर अॅनी अरुण यांनी ट्विटरवर या आगळ्या वेगळ्या लग्नाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी ट्विट केले की, "मी आज एका लग्नात सहभागी होत आहे. पण वधू-वरांचे जवळपास 30 वर्षांपूर्वी निधन झाले आणि आज त्यांचे लग्न झाले आहे. अॅनी अरुणच्या ट्विट स्रोतानुसार, हे लग्न इतर कोणत्याही सामान्य लग्नाप्रमाणेच औपचारिक होते. फरक एवढाच होता की या लग्नात खऱ्या वधू-वरांऐवजी त्यांच्या पुतळ्यांचा वापर करण्यात आला होता. हा आगळा वेगळा लग्न सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरला आहे.
प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडच्या डोक्यातल्या उवा काढायची वेळ आली, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....
दक्षिण कन्नडमध्ये पाळलेल्या परंपरेचे वर्णन करताना त्यांनी ट्विट केले की, ".. ही एक गंभीर परंपरा आहे. जे जन्मत:च मरण पावतात, त्यांचे लग्न सहसा दुसर्या अशा व्यक्तीशी केले जाते ज्याचा जन्मादरम्यान मृत्यू झालेला असतो. दोन कुटुंबे लग्नासाठी एकमेकांच्या घरी जातात. या कार्यक्रमात मिरवणूक आणि "सप्तपदी" देखील समाविष्ट होते.