Join us  

भटजीबुवांची मंत्र म्हणण्याची स्टाईल पाहून पोट धरून हसाल; लग्नाचा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 9:08 AM

सोशल मीडियावर लग्नाच्या  कार्यक्रमासंबंधित व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ हृदयाला स्पर्श करतात, तर काही तुम्हाला हसायला लावतात. नुकताच ...

सोशल मीडियावर लग्नाच्या  कार्यक्रमासंबंधित व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ हृदयाला स्पर्श करतात, तर काही तुम्हाला हसायला लावतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू-वर लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत.  भटजी बूवांची बोलण्याची स्टाईल पाहून उपस्थित सगळ्याच पाहूण्यांमध्ये हशा पिकला आहे. (Bride and groom started laughing after listening to panditji in the wedding pavilion)

अलीकडेच, इंटरनेटवर लग्नाचा एक मजेदार व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये एक भटजीबुवा लग्नाच्या वेळी खूप अनोख्या पद्धतीने काहीतरी बोलताना ऐकले आहेत, जे तिथे बसलेल्या कोणालाही समजू शकत नाही. व्हिडिओतील पंडितजींची स्टाइल पाहून लोकांना हसू आवरत नाही.  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पंडित जी आपल्या शब्दांतून सर्वांचे लक्ष कसे वेधून घेत आहेत. 

व्हिडिओमध्ये पंडितजींच्या बोलण्याचा वेग पाहून तिथे बसलेल्या प्रत्येकाला हसू फुटते. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'kct_aale' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर एक लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स वेगवेगळ्या मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया