लग्न म्हणजे आयुष्यभर एकमेकांच्या साथीने एकत्र राहण्यासाठी घेतलेल्या आणाभाका. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख-दु:खात एकमेकांना साथ देण्यासाठी पती पत्नी लग्न करुन एकत्र येत असतात. लग्नाचा दिवस तर सगळ्यांसाठीच खास असतो. त्यानंतरचेही काही दिवस खऱ्या अर्थाने मंतरलेले असतात. पण काहींच्या आयुष्यात मात्र काहीतरी वेगळेच लिहून ठेवलेले असते. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूने आपल्या पतीला घटस्फोट मागितला. आता अशाप्रकारचा टोकाचा निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाचे-मोठे कारण असेल असे आपल्यााल अगदी सहज वाटून जाते. मात्र हा घटस्फोट मागण्यामागे एक अतिशय लहानसे निमित्त घडले आहे. हे निमित्त ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही (Bride Asks for Divorce day after Wedding for Cake Prank).
प्रेम असावं तर असं! आजोबा करतात आजींना स्वयंपाकात मदत; पाहा आजीआजोबांचा प्रेमळ व्हिडिओ
तर मागच्या वर्षी ख्रिसमसच्या आधी एका जोडप्याचे लग्न झाले. लग्नानंतर संध्याकाळी ठेवण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये छानसा केक आणण्यात आला होता. पाश्चिमात्य देशांत साधारपणे कोणत्याही आनंदाच्या क्षणी केक कापण्याची पद्धत असल्याने हा केक आणला होता. केक कटींग झाल्यानंतर नवरदेवाने गमतीने हा केक नवरीच्या तोंडाला फासला. असे काही करायचे आहे असे ठरलेले नसताना त्याने असे केल्याने या नवरीला चांगलाच राग आला. ऐन फंक्शनमध्ये स्वत:च्याच लग्नात खुद्द नवऱ्यानेच आपला अवतार केल्याने ही नवरी त्याच्यावर चांगलीच चिडली. ही बाब फक्त चिडण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर तिने या नवऱ्याचा चक्क घटस्फोटच मागितला.
आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे, आनंदाने अश्रू अनावर.. व्हायरल व्हिडिओ
सुरुवातीला ती या लग्नासाठी तयारच नव्हती. मात्र या बॉयफ्रेंडने तिला प्रपोज केल्यानंतर आणि खूप मागे लागल्याने ती लग्नासाठी तयार झाली. माझ्या चेहऱ्याला केक लावायचा नाही हे मी त्याला आधी सांगितले होते. मात्र तरीही ऐनवेळी त्याने माझ्या चेहऱ्याला केक फासला आणि त्यामुळे मला राग अनावर झाला असे ही नवरी म्हणाली. त्याला मी माहिती असतानाही त्याने चुकीच्या पद्धतीने वागल्याने आपल्याला त्याच्यासोबत राहायची इच्छा नाही असे ही तरुणी म्हणाली. त्याने मला नुसता केक फासला नाही तर मागच्या बाजुने माझे डोके धरुन समोरच्या केकमध्ये अक्षरश: बुडवले. ही गोष्ट मला अजिबात सहन होणारी नसल्याने मला त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नाही असे तिने सांगितले. या नवऱ्याला दुसरा चान्स देऊन बघ असे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी समजावून पण तिने ऐकले नाही आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.