Lokmat Sakhi >Social Viral > 'बिचारा नवरा'! प्रेमवेडी बायको भर मंडपात नवऱ्याला मिठी मारून जोरदार नाचली; लोक म्हणाले....

'बिचारा नवरा'! प्रेमवेडी बायको भर मंडपात नवऱ्याला मिठी मारून जोरदार नाचली; लोक म्हणाले....

Bride dance video goes viral : वराचे एक्सप्रेशन पाहून तुम्हालाही हसू येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 12:55 PM2022-12-18T12:55:21+5:302022-12-18T13:12:49+5:30

Bride dance video goes viral : वराचे एक्सप्रेशन पाहून तुम्हालाही हसू येईल.

Bride dance video goes viral on social media bride groom viral funny dance video | 'बिचारा नवरा'! प्रेमवेडी बायको भर मंडपात नवऱ्याला मिठी मारून जोरदार नाचली; लोक म्हणाले....

'बिचारा नवरा'! प्रेमवेडी बायको भर मंडपात नवऱ्याला मिठी मारून जोरदार नाचली; लोक म्हणाले....

सोशल मीडियावर डान्सचे बरेच व्हिडिओज  व्हायरल होत असतात. भारतीय लग्नात खाण्यापिण्यापासून  पाहूण्यांचा मान-पान,  कपडेलत्ते यावर पाण्यासारखा खर्च केला जातो. याचदरम्यान काही क्षण असे असतात जे कधीही विसरत येत नाहीत. लग्नात नवरी नवरीचे आणि नातवाईकांचे डान्स व्हिडिओज बरेच व्हायरल होतात. (Viral Funny Dance Video) सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरा नवरी दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यनंतर युजर्स नवरीच्या डान्सचं कौतुक करत आहेत. (Bride dance video goes viral on social media bride groom viral funny dance video)

व्हिडीओमध्ये नववधू स्टेजवर मनापासून डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान, वराचे एक्सप्रेशन पाहून तुम्हालाही हसू येईल. व्हिडिओमध्ये नववधू थांबण्याचे नाव घेत नाहीत. नाचताना कधी ती वराचे हात हलवते, तर कधी ती जमिनीवर बसते. व्हिडिओमध्ये पुढे, वधू एक खुर्ची मागवते, वराला त्यावर बसवते आणि नंतर खुर्चीवर चढते आणि नाचू लागते. यादरम्यान नववधू अशा स्टेप्स करू लागते  ते पाहून उपस्थित लोकही आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. व्हिडिओमध्ये एकामागून एक लोक मंचावर येतात आणि पैसे उडवतात.

व्हिडीओतील वराला पाहून असे वाटते की, तो खूपच लाजाळू आहे आणि त्याला नाचायला फारसं आवडत नाही,  यादरम्यान  वधू आहे जी थांबण्याचे नाव घेत नाही. व्हिडिओमध्ये वराची अवस्था पाहून यूजर्स त्याला 'गरीब बिचारा' म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @anamika943 नावाच्या युजरने 19 ऑक्टोबर रोजी शेअर केला होता.

डाळ-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा खमंग, कुरकुरीत बटाट्याचे काप; ही घ्या सोपी रेसेपी

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'गरीब बिचारा नवरा अडकला.' या व्हिडिओला आतापर्यंत 222.6K व्ह्यूज मिळाले आहेत, तर पाच हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स विविध मजेशीर कमेंट करत आहेत.

Web Title: Bride dance video goes viral on social media bride groom viral funny dance video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.