Join us  

जेवढा मोठा आहेर, तेवढं भारी जेवण! लग्नाच्या आमंत्रणासह नवरीने दिली भन्नाट ऑफर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 3:17 PM

Bride deciding menu depending on cost of gifts trending wedding Card : कोण काय करेल आणि ते कुठे, कसं व्हायरल होईल हे सांगता येत नाही... जसा आहेर, तसं लग्नात जेवण मिळेल, बोला किती आहेर करणार?

ठळक मुद्देजसा आहेर, तसं लग्नात जेवण मिळेल..

लग्न म्हणजे केवढा मोठा सोहळा. मानपान, आहेर, रुसवेफुगवे आणि सगळ्यात महत्त्वाचा मेन्यू. कुणाच्या लग्न जेवण किती छान आणि किती वाईट होतं याची चर्चा लोक अनेक दिवस करतात. वऱ्हाड जाणं खाण्यासाठी अशी म्हण आहेच. त्यात लग्नात १०१, ५०१ रुपये आहेर देण्याचाही काळ गेला. आता कोण कुणाला काय गिफ्ट देतं आणि कुणी आपल्याला काय भेट दिली होती यावर सगळी प्रतिष्ठा प्रेमाची गणितं ठरतात. हे चांगलं की वाईट, त्यापायी होणारा वारेमाप खर्च यावर चर्चा होतेच. हल्ली अनेकजण आहेर क्षमस्व. आपल्या शुभेच्छा हाच आहेर असंही आमंत्रण पत्रिकेवर छापतात. जेवढं गिफ्ट मस्त, महागडं तसं जेवण. आहेर कमी जेवण साधं असे व्हाट्सॲप जोक्सही व्हायरल होतात. पण ते जोक खरे होतात की काय अशी ही एक व्हायरल गोष्ट आहे.  एका नव्या नवरीने एक अनोखी शक्कल लढवत आपल्या लग्नाला येणाऱ्यांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. (Bride deciding menu depending on cost of gifts trending wedding Card). जसा आहेर, त्याप्रमाणात जेवण. 

(Image : Google)

अमेरिकेत राहणाऱ्या एका नवरीने आपल्या लग्नात येणारे पाहुणे जितके महागडे गिफ्ट आणतील तितके उत्तमोत्तम जेवण त्यांना दिले जाईल असं थेट आमंत्रण पत्रिकेवरच छापलं आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहेर करणार, त्याप्रमाणे तुम्हाला काय जेवणात खास मेन्यू मिळेल हे तिनं थेट सविस्तर लिहिलं आहे.  

उडत्या विमानात जोडप्याचे असे उद्योग की पायलटने विमानाचा रुटच बदलला...

मध्ये लव्हिंग गिफ्ट, सिल्व्हर गिफ्ट, गोल्डन गिफ्ट आणि प्लॅटीनम गिफ्ट अशा ४ कॅटेगरी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अमुक डॉलरच्या वरचे गिफ्ट असणाऱ्यांना मांसाहारी पदार्थांमधले कोणत्या प्रकारचे जेवण आणि मासे देण्यात येतील यांची चक्क यादीच दिलेली आहे. 

(Image : Google)

यामध्ये स्वॉर्ड फिश, सॅलमन फिश, लॉब्स्टरचे प्रकार असे पर्याय देण्यात आले आहेत. लव्हिंग गिफ्ट कॅटेगरीमध्ये साध्या स्वरुपाचे जेवण तर प्लॅटिनम कॅटेगरीसाठी सर्वात महागडे मासे अशा जेवणाच्या ४ कॅटेगरी ठरवण्यात आल्या आहेत. म्हणजेच जो व्यक्ती ज्या प्रकारचे गिफ्ट देईल त्याला त्या पद्धतीचे जेवण अशी संकल्पना या लग्नात राबवण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही पत्रिका व्हायरल झाली.  अशाप्रकारे गिफ्टनुसार जेवण देणारे नक्की कोण आहेत याबाबत मात्र फारशी माहिती मिळाली नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल फोटोज्लग्नगिफ्ट आयडिया