अलिकडे लग्नाआधी प्री वेडींग फोटोशूट्सचा ट्रेंड खूप चालतो. (Pre Wedding Photoshoot) प्रत्येकजण लग्नाआधी प्री वेडींग फोटोशूट करताना दिसतो. या शूटसाठी लोक वेगेवगळ्या प्रकारच्या थीम्स ठरवतात. ज्यामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आवडत्या कॉस्ट्यूमनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या पोज देऊन फोटो काढतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नववधूने तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटसाठी काय केले हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Bride did workout during pre wedding )
या व्हिडिओमध्ये एक वधू साडी आणि दागिने घालून जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. फोटोशूटदरम्यान व्यायाम करताना ती वेगवेगळ्या पोझ देत आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, प्री वेडिंग फोटोशूट. आज धाडसाचे रहस्य उलगडले आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वधू पूर्णपणे साडी आणि दागिने परिधान करून जिममध्ये व्यायाम करत आहे. वधू हातात डंबेल घेऊन पोज देत आहे आणि जवळच एक फोटोग्राफर तिचा फोटो घेत आहे. हा व्हिडिओ लोक आश्चर्यचकित झाले असून त्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर आतापर्यंत १७ हजारांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. एका युजरनं तिला हिम्मतवाली असं म्हटलं आहे.