लग्नाचे सगळे विधी यथासांग पार पडतात. तेव्हा नवरा- नवरीसकट सगळेच (bride and groom) आनंदी असतात. पण जशी नवरीला निरोप द्यायची म्हणजेच तिच्या बिदाईची (bidaai) वेळ येते, तसं एकेक करून तिचे सगळेच नातेवाईक इमोशनल होऊन जातात. हल्ली आपण असेही बघतो की काही जणींना सासरी जाताना रडू येत नाही. पण त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती मात्र अवघड झालेली असते. जसा जसा बिदाईचा क्षण जवळजवळ येतो, तसंतसं त्यांना स्वत:ला सावरणं अवघड जातं आणि मग अश्रूंना मोकळी वाट करून दिली जाते. (no one cry during bidaai)
पण इथे या लग्नाची मात्र गोष्टच वेगळी. त्यामुळेच तर तो व्हिडिओ सध्या एवढा व्हायरल होत आहे. wedding_visual या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर (instagram share) करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एक महिन्यापुर्वीच शेअर करण्यात आला आहे. पण आपल्याकडे आता लग्नसराई सुरू असल्याने हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच शेअर होत आहे. ५० लाखांपेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की लग्नाचे सगळे विधी पार पडले असून एक नवरी तिच्या सासरी जाण्यासाठी निघाली आहे. सगळ्यांना टाटा- बाय- बाय करून ती गाडीत बसली आहे. पण ना त्या नवरीच्या डोळ्यात पाणी आहे, ना तिला बाय करायला आलेल्या तिच्या माहेरच्या माणसांच्या डोळ्यात पाणी आहे. तिच्या माहेरचा अख्खा गोतावळा तिला निरोप देण्यासाठी तिच्या शेजारी उभा आहे, पण कुणीही रडत नाहीये. हे सगळं पाहून त्या नवरीलाही थोडं वेगळंच वाटतंय.. ती शेवटी विचारते की ''तुम मे से कोई क्यू नही रो रहा? क्या हुवा?'' तिने असं म्हणताच तिला उत्तर मिळतं की ''हम क्यु रोये? हमारा मेकअप खराब हो जायेगा...'' त्याचं हे उत्तर ऐकून अनेकांची हसून हसून पुरेवाट लागली आहे आणि बिचारी नवरी तिला तर असं काही ऐकायला मिळेल, याची अपेक्षाच नसेल..