जेठालाल ही विनोदी भुमिका साकारणारे अभिनेते आहेत दिलीप जोशी (Dilip Joshi). त्यांची लाडकी लेक नियती (Niyati Joshi) हिचं लग्न मोठ्या थाटामाटात नाशिक येथे नुकतंच पार पडलं. एका मोठ्या अभिनेत्याची लेक म्हणजे लग्नही दणक्यात होणार हे अपेक्षित. त्यानुसारच लग्न झालं आणि लग्नातले, नवरदेव- नवरीचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल (social viral) झाले.. हे फोटो पाहून मात्र नेटकरी चांगलेच हैराण झाले आहेत. कुणी नियतीच्या हिमतीची दाद दिली तर कुणी स्वत:च्या लग्नात असं काही करून एक वेगळी वाट निवडणाऱ्या नियतीला ट्रेण्ड सेटर म्हणून गौरवलं..
आजकाल आपण असतो कसे यापेक्षा आपण दिसतो कसे.... याचाच जास्त गवगवा केला जातो. आपलं राहणीमान, आपलं दिसणं या सगळ्याबाबत प्रत्येक जणच खूपच कॉन्शस झाला आहे. यात चुक कुणाचीच नाही. कारण असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलेला हा जमाना. म्हणूनच तर अशा वेळी नियतीचं वागणं सगळ्यांपेक्षा वेगळं ठरतं.. दुरच्या नातलगाचं किंवा मित्रमंडळींपैकी कुणा लांबच्या व्यक्तीचं लग्न असलं तरी आपले केस नीट कलर आहेत का, एखादा पांढरा केस तर दिसत नाही ना.. याची आपण शाहनिशा करून घेतो. एखादा पांढरा केस दिसलाच तर तात्काळ त्याला रंगवून तरी टाकतो किंवा मग इतर केसांमध्ये त्याला लपवून तरी ठेवतो.
पण इथे मात्र या पठ्ठीनं म्हणजेच नियतीनं कमालच केली. स्वत:चं लग्न असतानाही केस (bride with a gray hair) रंगविले नाहीत. उलट पांढऱ्या केसांचीच छान हेअरस्टाईल करत ती मोठ्या आनंदाने बोहल्यावर चढली. आपले केस पांढरे आहेत, म्हणूनच ते झाकून टाकावेत, त्यांना कलर करून आपलं कृत्रिम सौंदर्य लग्नात सर्वांपुढे आणावं असं तिला मुळीच वाटलं नाही... नियतीचे हे लग्नातले फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले असून सोशल मिडियावर तिचं तुफान कौतूक केलं जात आहे. स्वत:ला आहे तसं स्विकारणं आणि जगापुढे तसं स्वत:ला प्रेझेंट करणं या दोन्ही गोष्टी अतिशय कठीण आहेत.. ते नियतीनं करून दाखवलं म्हणूनच तिच्या हिमतीला सलाम.. गुजराती पद्धतीने झालेल्या या लग्नात नियतीने ब्राईट रेड रंगाची गुजराती पद्धतीची साडी नेसली होती.
दिलीप जोशी यांच्या मुलाचेही केस पांढरेच...दिलीप जोशी यांच्या मुलाचे याच लग्न सोहळ्यातील काही फोटोही व्हायरल झाले आहेत. यामध्ये दिलीप जोशी यांच्या मुलाचे केसही पांढरेच असल्याचे दिसून येते. नियती सोबतच तिचा नवरा यशोवर्धन याचंही सोशल मिडियावर कौतूक होत आहे. हे दोघे चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते, असं बोललं जातं. म्हणूनच तर नियतीला आहे तशी स्विकारून तिच्यावर प्रेम करणाऱ्या यशोवर्धनवरही नेटकरी फिदा आहेत..
जेठालाल झाले भावूकमुलीच्या लग्नसोहळ्यात दिलीप जोशी अतिशय भावूक झाले होते. त्यांनी याविषयीची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सुरुवातीला नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर ते म्हणतात की तुम्ही गाणी, चित्रपट यांच्या माध्यमातून भावना उधार घेऊ शकता, पण जेव्हा ते तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडतं तेव्हा त्या अनुभवाची तुलना इतर कशासोबतही होऊ शकत नाही..