लग्न हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि खास इव्हेंट. हा इव्हेंट स्पेशल व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी आपण काही ना काही वेगळं करायचा प्रयत्नही करतो. माझ्या लग्नात मी असं करणार, तसं करणार अशी स्वप्नही अनेकदा आपण लहानपणापासून पाहत असतो, पण काही जण हे स्वप्न पूर्ण करतात. कोणी लग्नाला डोलीतून येतं, तर कोणी हेलिकॉप्टरनी एन्ट्री घेतात. काही दिवसांपूर्वीच एक नवरदेव ५१ ट्रक घेऊन मंडपात गेला होता. सोशल मीडियावर या गोष्टी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये नवरी मुलगी कशा पद्धतीने लग्नाच्या मंडपात एन्ट्री घेते हे पाहून आपल्यालाही तिचा हेवा वाटेल (Bride Groom Video Bride did such a Thing Before Marriage People Shocked After Watching Video).
तर या मुलीने लग्नाच्या मंडपात बुलेटवर जाणार असा हट्ट आपल्या वडीलांकडे केला. वडीलांनीही आपल्या मुलीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलीला बुलेटवर मंगल कार्यालयात येण्याची परवानगी दिली. या व्हिडिओमध्ये ही तरुणी बोहल्यावर चढण्याआधी तयार होण्यासाठी पार्लरमध्ये जाते. तिथून ती बुलेटवर बसून लग्नाच्या कार्यालयात जाते. बुलेट चालवणे ही रुबाबदार वाटणारी गोष्ट असली तरी हे काही सोपे काम नाही. बुलेटचे वजन, गिअर, रस्त्यावरची गर्दी या सगळ्या गोष्टींचे भान ही गाडी चालवताना ठेवावे लागते.
ही नववधू तर अतिशय हेवी असा लेहंगा, मेकअप, दागदागिने अशा रुपात बुलेट चालवताना दिसते. आपल्या लग्नाची एन्ट्री खास व्हावी यासाठी तरुणीने हा अनोखा स्टंट केला. बुलेटवर बसल्यावर ती आपला भरजरी लेहंगा नीट करताना दिसते. तर बुलेट चालवताना ती एक हात सोडून हाताने बायही करताना दिसते. अशाप्रकारे काहीतरी खास आणि वेगळं करत असल्याचा आनंद या तरुणीच्या चेहऱ्यावर झळकतो. इन्स्टाग्रामवर deera.makeovers या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला ३ लाखांच्या आसपास लाइक्स आले आहेत. तर व्हिडिओला प्रतिक्रिया देताना काहींनी या तरुणीचे कौतुक केले आहे तर अनेकांनी तिच्या या शो ऑफ करण्याची खिल्लीही उडवली आहे.