Join us  

जोडप्याचं खतरनाक प्री-वेडींग शूट, असले स्टंट करताना जीव गेला तर.. पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:53 AM

Bride Groom Stunt Video: प्री वेडिंग शूटच्या नावाखाली हल्ली वाट्टेल ते करतात, पण जीवाला धोका होईल इतपत काहीही करावे का?

प्री वेडिंग शूट आणि वेडींग फोटोशूटचं भारतील कपल्समध्ये खूप क्रेझ आहे. लोकांना फोटोशूट करायला खूप आवडतं. नवरा नवरीला या फोटोजच्या माध्यमातून त्यांना आठवणी आयुष्यभर संग्रहित करून ठेवण्याची इच्छा असते. कधी कधी काही अनावश्यक आणि अनपेक्षित प्रसंगही कॅमेरात कैद होतात. जेव्हा कधी हे जुने फोटो पाहिले जातात तेव्हा हसू आल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरा नवरी प्री वेडींग फोटोशुट करत आहेत. (Bride groom video groom stunt with bride on the bike people asks is this pre wedding shoot)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर दुचाकीवर बसलेले आणि समोर एक चारचाकी गाडी उभी असल्याचे दिसत आहे. वधू आणि वर त्याला पास करण्यासाठी स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मदतीसाठी एक जेसीबी मागवला जातो आणि त्यांना हवेत बांधून हवेत फेकले जाते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची लोक खिल्ली उडवत आहेत. @bestofallll नावाच्या ट्विटर अकाऊंटने ते शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'प्री-वेडिंग शूट्स - हे मला समजले आहे.' ही छोटी क्लिप 8 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि 14 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे.

इंटरनेटवर हा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला त्याला खूप मजा आली. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'अॅक्शन डायरेक्टर वाटतो.' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'यापेक्षा मी लग्न न केलेलेच बरे.' तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'रिश्क है तो ही प्यार है'.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया