Join us  

लग्नात फोटोशूट करण्याची हौसच फिटली! नवरदेवानं घातले साक्षात लोटांगण, नवरीबाईंचा गेला तोल.. पाहा व्हायरल व्हिडीओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 3:07 PM

Bride & Groom's Romantic Wedding Photoshoot Goes Wrong : Viral video : फोटोशूट करण्यासाठी काही जोडपी बऱ्याच युक्त्या करतात, मात्र फोटोंच्या नादात कधीकधी गडबड होतेच.

डिसेंबर महिना म्हटलं की, भारतात लग्नाचे वारे वाहू लागतात. लग्नाचे भरजरी कपडे, दागिने, हॉलबुकिंग, जेवणाचा मेन्यू या सगळ्या गोष्टींच्या याद्या तयार केल्या जातात. संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती लग्नाच्या कामात बिझी असतो. परंतु नवरा - नवरी एका वेगळ्याच महत्वाच्या कामात बिझी असतात आणि ते म्हणजे प्री - वेडींग आणि लग्नातील फोटोशूट. फोटोशूट करण्यासाठी काही जोडपी काय काय प्लॅन करतात हे सांगू शकत नाही. विवाहसोहळ्याची खरीखुरी सुरुवात होते, ती  प्री वेंडिंग फोटोशूट पासून, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्री - वेंडिंग झाल्यानंतर खास लग्नाच्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या पोझ देऊन फोटोशूट केले आहेत. हे फोटोशूट करताना फोटो चांगले येण्यासाठी प्रत्येक जोडपं तारेवरची कसरत करत असत. परंतु ही तारेवरची कसरत करत असताना काही धमाल, मजेशीर गोष्टी घडतात. या धमाल, मजेशीर, पोट धरून हसविणाऱ्या गोष्टी हमखास व्हायरल होतात. अशाच एका नवरा - नवरीची फोटोशूट करताना काय गंमत झाली ते सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे (Bride & Groom's Romantic Wedding Photoshoot Goes Wrong : Viral video).

jaipur_preweddings या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

काय आहे या व्हिडीओमध्ये? या व्हिडीओमध्ये, एक नवरा - नवरी लग्नाच्या पारंपरिक वेशात आपल्या लग्नाच्या स्टेजवर फोटो काढण्यासाठी पोझ देताना दिसत आहेत. फोटो काढण्यासाठी हे जोडपं वेगवेगळ्या पोझ देत आहेत. अशीच एक पोझ देताना, नवरी नवऱ्याचा हात पकडून गोल फिरत आहे. गोल फिरून झाल्यानंतर नवरा अतिशय रोमँटिक पद्धतीने नवरीच्या कमरेत हात घालून तिला आपल्या हातावर झेलण्याचा प्रयत्न करतो. परंतु असे करत असताना नवरीने घातलेल्या लेहेंग्यावरून त्या नवऱ्याचा पाय सटकतो. परिणामी, तो नवरा गडबडून नवरीच्या अंगावर पडतो. नवरा - नवरी दोघेही बेसावध असताना नवऱ्याचा असा अचानक तोल गेल्याने भर स्टेजवर फोटोसाठी पोझ देताना दोघेही गडबडून खाली पडले.  

  

नेटकरी काय म्हणत आहेत ? फोटोशूट करताना गडबड गोंधळून स्टेजवर पडलेल्या या नवरा - नवरीचा व्हिडिओ पाहून नेटकरी त्यांच्यावर खूप हसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर, याला एकूण १४ मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकाऱ्याने "ओरिजिनल रोमान्स" अशी प्रतिक्रिया दिली आहे. "हा पण लग्नाप्रमाणेच एक असा क्षण आहे की, जो कायम लक्षात राहील अशी प्रतिक्रिया एका नेटकाऱ्याने दिली आहे. "कदाचित नवरीच वजन जास्त असेल म्हणून असे झाले आहे. अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. "हे नवरा - नवरी खरचं एकमेकांच्या प्रेमात पडले" अशी पोट धरून हसविणारी कमेंट एका युजरने केली आहे.

टॅग्स :सोशल व्हायरल