Join us  

Bride marries cousin after groom slaps : लग्नात नाचत होती म्हणून होणाऱ्या पतीनं कानाखाली मारली; रागारागात तिनं चुलत भावाशीच लग्नगाठ बांधली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 4:58 PM

Bride marries cousin after groom slaps : चुलत भाऊ त्यांच्या खांद्यावर हात ठेवून नाचत होता ते नवऱ्या मुलाला कदाचित आवडलं नाही. वराने वधू आणि तिच्या चुलत भावाला ढकलून दिले.

लग्न म्हटलं की, डान्स, मजा मस्ती हे सगळं आलंच. लग्नात आपली होणारी पत्नी नाचली म्हणून रागावणारा पती तुम्ही कधीच पाहिला नसेल.  एका मुलीनं रागाच्याभरात भर मंडपात आपल्या चुलत भावाशी लग्नगाठ बांधली. याचं कारण म्हणजे तिचं स्वत:च्याच लग्नात नाचणं नवऱ्याला फारसं आवडलं नाही. त्यामुळे त्यानं त्याचक्षणी तिला कानाखाली मारली. (A bride married her cousin after her groom allegedly slapped her for dancing at a wedding function)

पाणरूती येथील रहिवासी असलेली मुलगी आणि परियाकट्टूपायालय येथील मुलाचा मागच्या वर्षी ६ नोव्हेंबरला साखरपुडा झाला होता. जानेवारी २० ला काडामपुलियूर या गावात ते विवाहबंधनात अडकणार होते. समाजातील प्रथेप्रमाणे लग्नाच्या एक दिवस आधी 19 जानेवारीला त्यांचे रिसेप्शन होतं.

मांड्यांच्या आतला भाग काळपट झालाय? उजळदार त्वचेसाठी ५ उपाय, शहनाज हुसैननं दिल्या खास टिप्स

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार डीजेच्या तालावर वधू-वर आनंदाने नाचले. पण जेव्हा वधूच्या चुलत भावाने या जोडप्याचे हात धरले आणि त्यांच्यासोबत नाचू लागला. तेव्हा सगळी गडबड झाली. चुलत भाऊ त्यांच्या खांद्यावर हात ठेवून नाचत होता ते नवऱ्या मुलाला कदाचित आवडलं नाही. वराने वधू आणि तिच्या चुलत भावाला ढकलून दिले.

मग सगळ्यांसमोर होणाऱ्या पत्नाीला कानाखाली मारून तिला स्टेजवर यायला सांगितलं. त्याचवेळी मुलीनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या पालकांनीही या निर्णयाला संमती दर्शवली. वधूच्या कुटुंबाला त्यांच्याच नातेवाईकांमध्ये एक योग्य वर सापडला आणि लग्न नवीन वराशी नियोजित वेळी, तारखेला पण नवीन ठिकाणी पार पडले.

 मऊ, गुलाबी ओठांना काळपट बनवतात रोजच्या ५ सवयी; अशी घ्या ओठांची काळजी

नाकारलेल्या वराने पाणरुतीच्या पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो म्हणाला की जेव्हा त्याने तिला विचारले की ती इतरांसोबत का नाचलीस, तेव्हा तिने त्याला सांगितले की, नाचण्याचा निर्णय पूर्णपणे तिचा आहे. वधूच्या कुटुंबीयांनी आपल्याला धमकी दिल्याचा,  शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्यानं केला आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल