Lokmat Sakhi >Social Viral > मांग भरो सजनी! कन्यादान नव्हे झाले कुंवरदान, तिने लावले त्याच्या कपाळी कुंकू.. अनोख्या लग्नाची व्हायरल गोष्ट

मांग भरो सजनी! कन्यादान नव्हे झाले कुंवरदान, तिने लावले त्याच्या कपाळी कुंकू.. अनोख्या लग्नाची व्हायरल गोष्ट

Social Viral: साेशल मिडियावर सध्या ही एका लग्नाची अनोखी गोष्ट चांगलीच व्हायरल (viral story of a marriage) झाली आहे... कुणाकुणाला ही नवी प्रथा जाम आवडली तर कुणी यावर भरपूर तोंडसुख घेतले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 12:47 PM2022-04-14T12:47:42+5:302022-04-14T12:48:30+5:30

Social Viral: साेशल मिडियावर सध्या ही एका लग्नाची अनोखी गोष्ट चांगलीच व्हायरल (viral story of a marriage) झाली आहे... कुणाकुणाला ही नवी प्रथा जाम आवडली तर कुणी यावर भरपूर तोंडसुख घेतले...

Bride puts sindhoor in groom's head or maang, and convert the rituals of 'kanyadaan' into 'Kunvardaan' | मांग भरो सजनी! कन्यादान नव्हे झाले कुंवरदान, तिने लावले त्याच्या कपाळी कुंकू.. अनोख्या लग्नाची व्हायरल गोष्ट

मांग भरो सजनी! कन्यादान नव्हे झाले कुंवरदान, तिने लावले त्याच्या कपाळी कुंकू.. अनोख्या लग्नाची व्हायरल गोष्ट

Highlights ही प्रथा करण्यासाठी तिचा होणारा नवरा सुरुवातीला तयार नव्हता.. तो थोडासा नाराज होता. पण नंतर.....

लग्न झालं की मुलीच्या कपाळावर टिकली येते.. सिंधूर (maang me sindhoor) भरला जातो.. हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि पायांत जोडवी येतात.. त्यामुळे तिने अगदी काहीही न बोलता तिचं लग्न झालेलं आहे, हे प्रत्येकाला ओळखू येतं.. त्या उलट मात्र पुरुषामध्ये लग्न झाल्यानंतर असा काहीच बाह्य बदल होत नाही... लग्न तर दोघांचंही होतं.. मग सौभाग्याच्या खाणाखुणा फक्त नवरीनेच अंगाखांद्यावर का मिरवायच्या? असा प्रश्न तिला पडला आणि तिने स्वत:च्या लग्नापासूनच बदल करायचा ठरवला...

 

अशा या आगळ्यावेगळ्या लग्नाचा व्हिडिओ Diksha 🏳️‍🌈@BrahmaandKiMaa या ट्विटर पेजवर (twitter) शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ती नवरी सांगते आहे की मी टिपिकल नवरी नाही.. जी सिंधूर भरणे, गळ्यात मंगळसूत्र घालणे, कन्यादान करणे या सगळ्या गोष्टी सहजपणे करेल. मी या सगळ्यांच्या विरोधात आहे.. म्हणून आम्ही अशा वेगळ्या पद्धतीने लग्न करायचं ठरवलं.. मंगळसूत्र मी घातलं नाही, पण सिंधूर भरण्याची जी प्रथा आहे ती आम्ही दोघांनीही पार पाडली. दोघांनीही एकमेकांना सिंधूर लावला.

 

त्यासोबतच या लग्नात आणखी एक मोठी प्रथा बदलण्यात आली.. आपल्याकडे नवरीचे आई- वडील मुलीचा हात नवरदेवाच्या हातात देतात आणि तिचं कन्यादान करतात. या लग्नात उलट झालं.. नवऱ्याच्या आई- वडिलांनी आपल्या मुलाचा हात होणाऱ्या सुनेच्या हातात दिला आणि त्याचं कुँवरदान केलं... ही प्रथा करण्यासाठी तिचा होणारा नवरा सुरुवातीला तयार नव्हता.. तो थोडासा नाराज होता. पण नंतर आम्ही दोघांनीही हे सगळं एन्जॉय केलं असंही या नवरीने सांगितलं आहे.. 

 

साेशल मिडियावर या लग्नाबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. काही जण म्हणत आहेत, या सगळ्या प्रथा जर मान्यच नव्हत्या, तर अशा पद्धतीने लग्न करण्याचा आणि त्या सगळ्या प्रथा नवऱ्याकडून करून घेण्याचा अट्टाहास का केलास.. यापेक्षा रजिस्टर लग्न केलं असतं तर सगळा खर्चही वाचला असता, असा समजदारीचा सल्लाही या नवरीला सोशल मिडियावरून मिळाला आहे तर काही जणांनी तिने जे काही केलं त्याबद्दल तिचं कौतूक केलं आहे.. तुम्हाला कशी वाटली या आगळ्या- वेगळ्या लग्नाची गोष्ट?


 

Web Title: Bride puts sindhoor in groom's head or maang, and convert the rituals of 'kanyadaan' into 'Kunvardaan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.