लग्न समारंभांमध्ये विधी सुरू असताना जोडप नवीन जीवनाची सुरवात करण्याच्या स्वप्नात असते.(Bride Ran From Wedding With Money) फेऱ्यांची वेळ जवळ येते आणि आता गाठ आयुष्यभरासाठी जोडली जाणार असं वाटायला लागतं. पण ज्याला तुम्ही आयुष्यभराचा सोबती समजत होतात तो फेऱ्यांच्या मधूनच गायब झाला तर? लोक पैशांसाठी कोणत्याही थराला जातात.(Bride Ran From Wedding With Money) स्त्रीसाठी लग्न म्हणजे आयुष्यातला आनंदी क्षण. असं असलं, तरी या महिलेसाठी लग्न पैसे कमवण्यासाठीचा बहाणा होता. घटना गोरखपुर मधील खजनी गावातील आहे. फेऱ्यांच्या वेळी नवरी गायब झाली आणि मुलाची तर तारांबळच उडाली.
झालं असं की, सीतापुर जिल्ह्यातील गोविंदपुर गावातील रहिवासी कमलेश कुमार हा एक शेतकरी आहे. त्याचे वय ४० वर्षे आहे. त्या पत्नीचा दुर्देवी मृत्यू झाला. तो दुसरे लग्न करत होता. एका माणसाने स्थळ सुचवले आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला कमलेशने लग्न जुळविण्यासाठी ३० हजार रूपये दिले.३ जानेवारीला लग्न करायचे असे ठरले.(Bride Ran From Wedding With Money) लग्नाचा दिवस उजाडला आणि कमलेश सर्व नातेवाईकांसमवेत गोरखपुरला पोहचला मुलगी व तिची आई दोघीच तिकडे गेल्या. मुलीला कमलेशने साड्यांपासून दागिन्यांपर्यंत सगळ्यासाठी पैसे दिले होते. शिवाय घरातले दागिने दिले होते.
विधी सुरू झाले. सर्व विधी होऊन फेऱ्यांची वेळ आली तेव्हा नवरीला अचानक पोटात कळ आली आणि जाणे जरूरी आहे म्हणाली. सर्व जण नैसर्गिक औपचारीकता आहे म्हणून थांबून राहिले. आता येईल नंतर येईल करत बराच वेळ गेला तेव्हा शोधाशोध सुरू झाली. मुलीची आईसुद्धा दिसेनाशी झाल्यावर संशयाने मुलीच्या सामानाकडे मंडळी वळली. मुलीचे सर्व सामान गायब होते. साड्या, दागिने, पैसे जे काही मिळाले ते घेऊन नवरी व तिची आई फरार झाल्या होत्या. नवऱ्याच्या तर तोंडचं पाणीच पळालं. नवरी तर गेलीच तो कंगाल पण झाला. कमलेश म्हणाला, मला फक्त सुखी संसार हवा होता पण माझं तर सगळंच चोरीला गेलं. त्याने कोणतीही तक्रार नोंदविली नाही. त्याला पोलीसांनी तक्रार नोंदव, आम्ही शोधून काढतो असं आश्वासन दिलं आहे.