लग्नाचा दिवस प्रत्येकासाठीच खूप खास असतो. या दिवशी आपण सगळ्यात सुंदर दिसावं असं अनेकांचं स्वप्न असतं. कित्येक महिन्यांपासून लग्नाच्या दिवसासाठी तयारी सुरू असते. विशेष म्हणजे जेव्हा मुलीचं आपल्या आवडच्या मुलाशी लग्न होणार असतं त्यावेळी मुळी फार इन्जॉय करतात. (Bride Viral Video) इतकंच नाही तर नवरा वरात घेऊन आल्यानंतर त्याला पाहण्याची खूप मुलींची इच्छा असते. अनेकजणी लपून आपल्या होणाऱ्या पतीला पाहतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत नवरी बाल्कनीतून आपल्या होणाऱ्या पतीला पाहण्याचा प्रयत्न करते. पण त्यानंतर ती जे करते ते पाहून तुम्हालाही आनंद होईल. (Bride reached the balcony to see the groom then she would laugh after seeing what happened)
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मिरवणूक आली आहे आणि वर आपल्या कुटुंब आणि मित्रांसह बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश करत आहे. मग वधूही वराला पाहण्यासाठी गुपचूप बाल्कनीत उभी राहते आणि वराकडे पाहू लागते. काही वेळातच, वधू आपल्या वराला पाहून इतकी आनंदी होते की ती बाल्कनीत उभी राहून नाचू लागते आणि हसत तिथून निघून जाते.
जगात कुठे हिंडा पण..' साफसफाईनंतरचा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या....
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर the.bride.magazine नावाच्या पेजने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - मुलीला तिच्या पसंतीचा वर सापडला आहे. दुसऱ्याने लिहिले - प्रत्येक वधू तिच्या वराची वाट पाहत असते.