Join us  

आधी 8 मागण्या मान्य कर, काँट्रॅक्टवर सही कर, मग करू लग्न! नवरीची मागणी, भांडण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2022 3:44 PM

सध्या सोशल मीडियावर एका लग्नातला एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे एक काॅन्ट्रॅक्ट ( contract) ज्यावर नवरी नवरदेवाकडून सर्वांच्या समक्ष नवरदेवाची (bride take a sign of groom on contract paper after marriage) स्वाक्षरी घेते. असं काय आहे त्या काॅन्ट्रॅक्टमध्ये?

ठळक मुद्दे नवरीनं लग्न लागल्याबरोबर लगेचंच आपल्या मागणीपत्रावर नवरदेवाची आणि साक्षीदारांची सही घेण्याचं काम लगेचंच उरकून घेतलं आहे.काॅन्ट्रॅक्टमध्ये नवरीच्या आठ मागण्या आहेत. 

लग्न म्हणजे धामधूम, मजा आणि गंमतीजमती. लग्न ही त्या जोडप्याची आणि त्यांच्याशी संबंधित नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींची खाजगी बाब असली तरी सोशल मीडियामुळे आपण ज्यांना ओळखत नाही अशा लोकांच्या लग्नातल्या विशेष क्षणांची, त्यांच्या लग्नातील गंमतीज्मती आणि अजब गोष्टींचे साक्षीदार् होतो. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातला एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे एक काॅन्ट्रॅक्ट (contract)  ज्यावर नवरी नवरदेवाकडून सर्वांच्या समक्ष नवरदेवाची स्वाक्षरी (bride take a sign of groom on contract paper after marriage)  घेते. 

1999 मध्ये काजोल आणि अनिल कपूरचा 'हम आपके दिल में रहते है' नावाचा एक चित्रपट आला होता. तो चित्रपट गाजला तो काॅन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे. विशिष्ट अटीशर्तींवरचं एक वर्षाचे लग्नसंबंध असणारं ते काॅन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे त्यात  लग्न पारंपरिक पध्दतीचं असलं तरी या लग्नात नवरीनं आपल्या मागण्यांचं एक काॅन्ट्रॅक्टच बनवून घेतलं आहे. 

बऱ्याचदा लग्नाआधी वधू वर एकमेकांशी बोलताना  लग्नानंतरच्या सहजीवनातील अनेक गोष्टींना तोंडी मान्यता देतात. पण लग्नानंतरचे नव्याचे नऊ दिवस सरले की एकमेकांना एकमेकांच्या मागण्या डोईजड होवू लागतात. मी असं म्हणालोच नव्हतो.. मला तुझी ही गोष्ट मुळी मान्य होणारच नाही असं म्हणत एकमेकांशी भांडत बसतात. असं आपल्याबाबतीत होवू देवू नये म्हणून नवरीनं आधीच काळजी घेतलेली दिसते. तिनं एका मोठ्या कार्डपेपरवर आपल्या मागण्या लिहून त्यावर स्वत: सही करुन नवरदेवाची आणि लग्नाला उपस्थित असलेल्यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेतली आहे. 

Image: Google

नवरीनं लग्न लागल्याबरोबर लगेचंच आपल्या मागणीपत्रावर नवरदेवाची आणि साक्षीदारांची सही घेण्याचं काम लगेचंच उरकून घेतलं आहे.  नवरीनं नवरदेवाची सही घेतलेल्या कागदावरील मागण्या मोठ्या रंजक आहे. या कागदावर  नवरीनं आपल्या मनातल्य आठ मागण्या लिहिलेल्या आहेत. 1. महिन्यातून एकदाच पिझ्झा खावा. 2. घरच्या जेवणाला नेहेमी होच म्हणावं लागेल. 3. रोज मी साडीच नेसेन. 4.  नवरा लेट नाइट पार्टी करु शकतो प्ण ती फक्त माझ्यासोबतच. 5. रोज जिमला जाणं आवश्यक आहे. 6. रविवारचा नाश्ता नवऱ्याला तयार करावा लागेल. 7. कोणत्याही पार्टीला वगैरे गेल्यावर माझा चांगला फोटो काढणं मस्ट आहे. 8. दर 15 दिवसांनी शाॅपिंगला घेऊन जावं लागेल. 

लग्नानंतर मी असं म्हणालोच नव्हतं/ असं काही कबुल केलंच नव्हतं असं म्हणून नवरदेवाला पलटी मारता येणं अशक्य आहे. नवरीनं नातेवाईक आणि मित्र मैत्रिणीं समोरचं अटी शर्तींचा कागद ठेवल्यानं त्यावर सही न करुन नवरदेवाला आडमुठेपणा दाखवणं कठीण झालं आणि नवरदेवाला शांतपणे त्या काॅन्ट्रॅक्टवर सही करण्याशिवाय काही पर्यायच राहिला नाही. या व्हिडीओत कान्ट्रॅक्टवर सही घेताना नवरी मोठी आनंदात दिसते आहे तर नवरदेव थोडा शांत आणि उदास वाटतो आह्. लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींना या आगळ्या वेगळ्या काॅन्ट्रॅक्टचं अप्रूप आणि मजा वाटली आहे हे त्यांच्या चेहऱ्यांकडे बघतांना सहज लक्षात येतं. 

Image: Google

लग्नातल्या काॅन्ट्रॅक्टचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटिझन्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. लग्नातच नवरदेवाकडून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्याची नवरीची युक्ती अनेकांना आवडली आहे. तर काहींना नवरीच्या काही मागण्या या योग्य तर काही मागण्या जरा अतीच वाटल्या आहे. तर काहींसाठी लग्नात असं काॅन्ट्रॅक्टवर सही करुन घेणं हा प्रकारच नवीन होता. पण लग्नानंतर नवऱ्यानं लग्नाआधी जे बोललं आहे त्यावरुन पलटी खाऊ नये म्हणून काय करायला हवं याचा उपाय व्हिडीओतील नवरीनं अनेक गरजू मुलींपुढे ठेवला आहे. त्यामुळे या मुली या धाडसी मुलीला मनातल्या मनात नक्कीच धन्यवाद देतील. 

टॅग्स :सोशल व्हायरललग्न