Join us  

ऐन लग्नात नवरीबाईने घेतली डुलकी, इतकी दमली की... व्हिडियो व्हायरल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 1:22 PM

लग्नाचे विधी सुरू असताना थकलेली नवरी लागली पेंगायला, नेटीझन्सनी केले कौतुक

ठळक मुद्देस्वत:च्याच लग्नात डुलक्या घेणारी नवरी पाहिली? लग्नाचे ऐन विधी सुरू असताना थकलेल्या नवरीला मात्र झोप अनावर

लग्न ही एक आनंदाची प्रक्रिया असली तरी ती थकवणारी असते. नवरा-नवरी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा लग्नसोहळ, त्यातही मुलीसाठी आणि तिच्या घरच्यांसाठी हे सगळे अजिबात उसंत देणारे नसते. लग्नासाठी कपड्यांची खरेदी, येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई, सासरच्या मंडळींचे मानपान अशा अनेक गोष्टी असतात. यातच लग्नाचा मुहूर्त काही दिवसांवर असेल की मग रात्रीचा दिवस करुन ही कामे केली जातात. हे सगळे करता करता नवऱ्या मुलीचीही खूप दमछाक होते. खरेदी, पॅकींग, घरातल्या इतरांचे सगळे, नवीन आयुष्याचा नकळत येणारा ताण, एकीकजे नोकरी असे सगळे करता करता मुलींची झोप उडते किंवा अपुरी होते. 

अशाच एक झोप न झालेल्या आणि ऐन लग्नात डुलकी काढत असलेल्या एका नवरीचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाल रंगाचा भरजरी लेहंगा, त्यावर सुंदर असा मेकअप आणि दागिने असे केलेली ही नवरी सकाळी ६ वाजता लग्नाच्या विधींना बसली आहे. मात्र तिची पुरेशी झोप न झाल्याने विधी सुरु असतानाच तिला डुलक्या येत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसते. कप्तान साहिबा असे नाव असलेल्या बॅटर्ड सुटकेस नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडियो पोस्ट कऱण्यात आला आहे. यामध्ये नवरी मुलीला विधींसाठी बसवले असल्याचे समजत आहे.

ही नवरी अशी डुलक्या घेत असताना तिचा नवरा तिच्या बाजूला उभा असल्याचे दिसते तर तिच्या मैत्रीणींनी तिचा हा व्हिडियो आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. हा व्हिडियो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला ९० हजारांहून अधिक व्ह्यूव मिळाले आहेत. तर अनेकांनी क्यूट नवरी असा रिप्लाय करुन डुलक्या घेणाऱ्या या नवरीचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामलग्न