Join us  

Bride took special entry in wedding : जबरदस्त! लग्न मंडपात नववधूची रॉयल एंट्री; पाहा नव्या नवरीचा तुफान व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 2:41 PM

Bride took special entry in wedding : व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की वधूला तिच्या लग्नात एखाद्या राणी किंवा परीप्रमाणेच खास एंट्री करायची असावी.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षणं असतो. आपलं लग्न, लग्नाचे विधी अविस्मरणीय असावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्याासाठी काहीही करण्याची नवरा, नवरीची तयारी असते. लग्नाच्या दिवशी  पालखीतून, कोणी बाईकवरून, कोणी घोड्यावरून तर काहीजण जेसिबीतूनही एंट्री घेतात. (Bride took special entry in wedding)

सध्या सोशल मीडियावर एका नव्या नवरीच्या एंट्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात वधूचा ड्रेस फुग्याच्या मदतीने हवेत उडताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असल्याचं दिसत आहे. अशा पद्धतीची एंट्री तुम्ही कधीच पाहिली नसेल. 

व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की वधूला तिच्या लग्नात एखाद्या राणी किंवा परीप्रमाणेच खास एंट्री करायची असावी. समोर आलेला व्हिडिओ पाहिल्यावर वधूचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. वधूचा गाऊन किंवा ड्रेसच्या मागे असलेली ओढणी इतर कोणत्याही महिलेच्या हातात न धरता ती अनेक फुग्यांमध्ये बांधला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

यावेळी, स्टेजकडे जाणारी वधू एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे. सध्या व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत १३.७ दक्षलक्षांहून अधिक व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले आहेत. हजारो लोकांनी गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. 

टॅग्स :सामाजिकसोशल मीडियासोशल व्हायरल