Lokmat Sakhi >Social Viral > भरमंडपात वधूच्या प्रियकराचा अजब प्रताप, नवऱ्यासमोर केलं असे काही..व्हिडिओ व्हायरल

भरमंडपात वधूच्या प्रियकराचा अजब प्रताप, नवऱ्यासमोर केलं असे काही..व्हिडिओ व्हायरल

Social Viral Video प्रियकराने केला अजब कारनामा, नवऱ्यासमोर भरमंडपात प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2023 04:00 PM2023-01-03T16:00:25+5:302023-01-03T16:00:57+5:30

Social Viral Video प्रियकराने केला अजब कारनामा, नवऱ्यासमोर भरमंडपात प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरला

Bride's boyfriend's surprise in Bharmandap, something he did in front of his husband..video viral | भरमंडपात वधूच्या प्रियकराचा अजब प्रताप, नवऱ्यासमोर केलं असे काही..व्हिडिओ व्हायरल

भरमंडपात वधूच्या प्रियकराचा अजब प्रताप, नवऱ्यासमोर केलं असे काही..व्हिडिओ व्हायरल

सध्या सर्वत्र लग्न सराईचा माहौल सुरु आहे. लग्नातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत राहतात. त्यातील काहींचे हटके डान्स स्टेप्स इंटरनेटवर तुफान गाजतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका जोडप्याचं लग्न सोहळा तर पार पडला. मात्र, वधूच्या प्रियकराने स्टेजवर येऊन असा काही कारनामा केला आहे, जे पाहून उपस्थित असलेला प्रत्येक जण स्तब्ध झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वधू - वर आपल्या लग्न सोहळ्यातील विधी पार पाडून स्टेजवर बसले आहेत. उपस्थित पाहुणे स्टेजवर येऊन वधू आणि वराला शुभ आशीर्वाद देताना दिसून येत आहे. त्याच दरम्यान, नवरीचा प्रियकर मफलर बांधून स्टेजवर पोहोचतो, आणि नवरीच्या भांगेत कुंकू भरतो.

नवरीच्या भांगेत कुंकू भरल्यानंतर नवऱ्यासह वऱ्हाडी मंडळी देखील चक्रावून जातात. हे दुष्य पाहून नवर देवाचा राग अनावर होतो. मात्र, तो त्याच्या जागेवरच बसलेल्या दिसून येत आहे. प्रियकर काही वेळ स्टेजवरच उभा असलेला दिसून येत आहे. त्यानंतर स्टेजवरून तो खाली निघून जातो.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ gieddee नावाच्या युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, “नवरीचाही यामध्ये सहभाग असणार, त्यामुळेच तिने या घटनेला विरोध केला नाही.” सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला असून इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.    

Web Title: Bride's boyfriend's surprise in Bharmandap, something he did in front of his husband..video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.