Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरच्या भांड्याचा खालचा भाग काळपट-मेणचट दिसतो? बेकिंग सोडाचा ‘असा’ वापर, एका मिनिटात भांडं चमकेल

मिक्सरच्या भांड्याचा खालचा भाग काळपट-मेणचट दिसतो? बेकिंग सोडाचा ‘असा’ वापर, एका मिनिटात भांडं चमकेल

Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like new : मिक्सरची भांडी बाहेरुन-खालून अत्यंत तेलकट-ओशट दिसतात, त्यावर हा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 04:37 PM2024-10-14T16:37:53+5:302024-10-14T16:39:02+5:30

Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like new : मिक्सरची भांडी बाहेरुन-खालून अत्यंत तेलकट-ओशट दिसतात, त्यावर हा उपाय

Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like new | मिक्सरच्या भांड्याचा खालचा भाग काळपट-मेणचट दिसतो? बेकिंग सोडाचा ‘असा’ वापर, एका मिनिटात भांडं चमकेल

मिक्सरच्या भांड्याचा खालचा भाग काळपट-मेणचट दिसतो? बेकिंग सोडाचा ‘असा’ वापर, एका मिनिटात भांडं चमकेल

मिक्सरचा वापर प्रत्येक घरात होतो (Mixer Grinder). पटकन मिक्सर फिरवला तर, पेस्ट किंवा पावडर तयार होते. मिक्सर वर्षभर टिकते. पण महिनोमहिने स्वच्छ न केल्यास मिक्सर लवकर घाण होते (Cleaning Tips). मिक्सरचं भांडं स्वच्छ करताना आपण खालचा भाग स्वच्छ करत नाही. ज्यामुळे त्यात काळपट थर जमा होऊ लागतो. ज्यामुळे भांडं खूप जुनाट दिसू लागते. मिक्सरच्या खालची बाजू साफ करताना बराच वेळ जातो, आणि घासूनही मिक्सरचं भांडं स्वच्छ होत नाही. अस्वच्छ मिक्सर वेगानं फिरतही नाही.

त्यामुळे वापरतानाही बराच वेळ जातो. मिक्सरची खालची बाजू जर घासून अस्वच्छ असेल, तर घासणीने न घासता आपण काही टिप्स फॉलो करून पाहू शकता. या टिप्समुळे मिनिटात मिक्सरची खालची बाजू क्लिन होईल. शिवाय जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही. घासणीने न घासता, मिनिटात मिक्सरचं भांडं चकाचक दिसेल(Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like new). 

ऐन तारुण्यात किडनी स्टोनचा त्रास का छळतो? ४ गोष्टी करा, किडनीचे आजार राहतात लांब

मिक्सरची खालची बाजू स्वच्छ करण्यासाठी ट्रिक्स

पहिली ट्रिक

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्याची उलटी बाजू ठेवा. त्यात चमचाभर बेकिंग सोडा आणि ३ चमचे व्हिनेगर घाला. काही वेळ तसे राहू द्या. 
आता एक जुना टूथब्रश घ्या. ब्रशने मिक्सरची खालची बाजू घासून काढा. शेवटी पाण्याने मिक्सर धुवून घ्या. अशा पद्धतीने साफ केल्यास मेहनत न घेता मिनिटात मिक्सरचं भांडं क्लिन होईल.

दुसरी ट्रिक

मिक्सरच्या भांड्याची खालची बाजू स्वच्छ करण्यासाठी आपण दुसरी ट्रिकही ट्राय करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा बेकिंग सोडा, डिटर्जंट पावडर, मीठ घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

नंतर मिक्सरच्या खालच्या भागावर कोणतेही डिशवॉश लिक्विड स्प्रे करून घ्या. त्यानंतर एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने तयार करून घेतलेली पेस्ट मिक्सरच्या खालच्या भागावर लावून मिक्सर घासून घ्या. आणि शेवटी पाण्याने धुवून घ्या. या ट्रिकमुळे मिनिटात मिक्सरच्या भांड्याची खालची बाजू स्वच्छ होईल. 

Web Title: Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.