Join us

मिक्सर ग्राईंडरच्या खालचा भाग स्वच्छ करणे कठीण काम? १ सोपी ट्रिक, मिक्सर ग्राईंडर दिसेल नव्यासारखे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2023 16:04 IST

HOW TO CLEAN MIXER GRINDER BOTTOM : मिक्सर ग्राईंडरच्या खालच्या भागाची स्वच्छता नीट करता येत नाही, वापरा एक सोपा उपाय...

'मिक्सर' ही स्वयंपाक घरातली अतिशय उपयुक्त अशी वस्तू आहे. पटकन मिक्सर फिरवला आणि आपल्याला पाहिजे तो पदार्थ आपल्याला हवा तेवढा बारीक केला की स्वयंपाक झटपट तयार होतो. चटणी, वाटण, ज्यूस अशा रोजच्या आहारातल्या अनेक पदार्थांसाठी मिक्सरची गरज भासते. मिक्सरचा वापर आपण रोजच्या रोज तर करतोच. रोज काही ना काही पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्यानंतर त्यावर बरेचदा मसाल्यांचे डाग पडतात. मिक्सरवर मसाल्यांचे डाग पडले असता ते स्वच्छ करणे देखील तितकेच महत्वाचे असते. 

मिक्सरची स्वच्छता करताना आपण तो सगळ्या बाजुंनी नीट व्यवस्थित स्वच्छ करतो. परंतु मिक्सरच्या खालच्या बाजुंनी (HOW TO CLEAN MIXER GRINDER BOTTOM) तो स्वच्छ करणे अगदी कठीण काम असते. बरेचदा आपण मिक्सर आतून - बाहेरून स्वच्छ तर (How to Clean Mixing/blending Jars in 1 minute) करतो परंतु मिक्सरचा खालचा भाग हा नीट स्वच्छ करता येत नाही. असा मिक्सर वेळीच स्वच्छ केला नाही तर ते भांड खूप जुनाट दिसू लागत. याचबरोबर त्या मिक्सरच्या खालच्या भागात काळपट - मेणचट थर साचून राहतो, ज्यामुळे मिक्सर वेगानं फिरत नाही. अशावेळी आपण एक साधीसोपी ट्रिक वापरुन खराब झालेल्या मिक्सरच्या खालचा भाग अतिशय झटपट स्वच्छ करु शकतो(Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like ‘new’).

मिक्सरच्या खालचा भाग स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक... 

लागणारे साहित्य :- 

१. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून २. डिटर्जंट पावडर - १ टेबलस्पून ३. मीठ - १ टेबलस्पून ४. डिशवॉश लिक्विड स्प्रे - १ टेबलस्पून 

नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

कृती :- 

एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून बेकिंग सोडा, डिटर्जंट पावडर, मीठ घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून घ्यावा. हे मिश्रण ढवळून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता सर्वप्रथम मिक्सरच्या खालच्या भागावर कोणतेही डिशवॉश लिक्विड स्प्रे करून घ्यावे. त्यानंतर एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने तयार करून घेतलेली पेस्ट मिक्सरच्या खालच्या भागावर लावून मिक्सर घासून घ्यावा. त्यानंतर कोणत्याही डिशवॉश लिक्विड सोपचा वापर करून हे भांड पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने भांड धुवून घ्यावे. अशाप्रकारे ही सोपी ट्रिक वापरून आपण मिक्सरच्या खालच्या भागातील कठीणातले कठीण हट्टी, चिकट, मेणचट डाग अतिशय सहजरित्या काढू शकतो.

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्स