बायकांना खरेदी करायला खूप आवडतं. पण नवरा सोबत असला की अनेकदा म्हणावी तशी खरेदी करता येत नाही. नवरा बायकोच्या शॉपिंग वेडाला कंटाळतो असं सांगणारे जोक्सही आता फार जुने झाले. म्हणजे एकदम क्लिशे. खरंतर काही पुरुषांना शॉपिंग आवडते, काही बायकांना. त्यामुळे जोक ठेवू बाजूला पण कल्पना करा की शॉपिंगला जाताना नवऱ्याला बायको डे केअर सेण्टरमध्ये सोडून जातेय. तो तिकडे निवांत, ही आपली मनसोक्त शॉपिंग खाणंपिणं करुन परत येतेय तर..
नवऱ्यांसाठी पाळणाघर... नेमकी भानगड काय आहे ?
पाळणाघर तर लहान मुलांसाठी असतं पुरुषांसाठी नव्हे. पण होय, हे पाळणाघर म्हणजेच डे केअर सेंटर पुरुषांसाठीच आहे. ज्या महिलांना स्वत:साठी वेळ हवाय, ज्यांना खरेदी करायची आहे, किंवा कुठेतरी छान फिरायला जायचेय. अशा महिला आपल्या नवऱ्याला या पाळणाघरात ठेवून जाऊ शकतात असं ही जाहिरातवजा पाटी सांगते. या ठिकाणी नवऱ्याची पूर्ण काळजी घेतली जाईल. फक्त त्याच्या ड्रिंक्सचे पैसे मात्र बायकोला भरावे लागतील असा हा फलक. त्यात खरंतर कल्पकता आहे आणि जगण्यातल्या विरोधाभासावर मिश्किल कमेण्टही.प्रत्येकाला आणि प्रत्येकीलाच असा निवांत एकटेपणा हवा असतो अगदी एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरीही. त्याच मानसिकतेला हाक मारणारी खरं तर ती जाहिरात आहे.
फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...
देखणी नाजूकसाजूक बार्बी बदलली, ही नवीन डाऊन सिंड्रोम बार्बी सांगतेय...
या जाहिरातीची पोस्ट शेअर करत आनंद महिंद्रा म्हणतात...
“नाविन्य म्हणजे केवळ नवीन उत्पादने तयार करणे नाही, तर अगोदरच उपलब्ध असलेल्या उत्पादनांसाठी नवीन ग्राहक तयार करणं होय.” असं ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी या जाहिरातीचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.ही भन्नाट कल्पना असंख्य नवऱ्यांच्या पसंतीस पडली आहे. अनेकांनी त्यावर विनोदी, मिश्किल कमेंट्सही केल्या आहेत.