बहुतांश घरांमध्ये औषधांचा संपूर्ण बॉक्स असतो. त्या बॉक्समध्ये डोकेदुखी, खोकला, सर्दी, ताप यावर आराम देणारे औषधे असतात. ही औषधे आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरतात. परंतु काही वेळा दीर्घकाळ ठेवलेली औषधे एक्सपायर्ड होतात. तारीख निघून गेलेल्या गोळ्या आपण कोणीच खात नाही. पण बऱ्याचदा आपल्याला औषधांचा बॉक्स साफ करायला वेळ मिळत नाही.
अशावेळी घरात औषधांचा साठा जमा होतो. बरेच लोकं एक्सपायर्ड औषधं फेकून देतात. पण औषधं फेकून देण्यापेक्षा त्याचा इतर वापर कधी करून पाहिलं आहे का? एक्सपायर्ड औषधांचा वापर कुठेच होणार नाही, असा विचार करून आपण औषधं कचऱ्यात फेकून देतो (Cleaning Tips). पण याचा वापर आपण किचन क्लिनिंग, गार्डनिंग किंवा ब्लॉक सिंक साफ करण्यासाठी करू शकता(Brilliant Reuse Of Expired Medicine | Kitchen Cleaning Tips).
ब्लॉक सिंक
जेवण करून झाल्यानंतर आपण खरकटी भांडी किचन सिंकमध्ये ठेवतो. बऱ्याचदा अन्नाचे तुकडे बेसिनच्या पाईपमध्ये जाऊन अडकते. ज्यामुळे किचन सिंक ब्लॉक होते. ब्लॉक झालेले किचन सिंक लवकर साफ होत नाही. अशावेळी आपण प्लंबरला बोलवतो. पण प्लंबरला बोलवण्याऐवजी आपण घरात एक्सपायर्ड औषधांचा वापर करून सिंक साफ करू शकता. यासाठी कोमट पाण्यात २ ते ३ एक्सपायरी डेट ओलांडलेली औषधं घालून मिक्स करा. रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी सिंकमध्ये ओता. या पाण्यामुळे ब्लॉकेज तर निघेलच शिवाय, झुरळं आणि बारीक किडेही कमी होतील.
एलपीजी गॅस बचत करण्याच्या ५ खास टिप्स, महागाईच्या काळात सिलेंडर लवकर संपणार नाही
बाथरूमच्या पाईपमधून किडे येणार नाहीत
बऱ्याचदा बाथरूम स्वच्छ असते, पण बाथरूमच्या पाईपमधून किडे आणि गंध पसरते. यावर उपाय म्हणून आपण एक्सपायर्ड औषधांचा वापर करून पाहू शकता. यासाठी कोमट पाण्यात २ ते ३ एक्सपायरी डेट ओलांडलेली औषधं घालून मिक्स करा. तयार पाणी बाथरूमच्या पाईपमध्ये ओता. यामुळे पाईप साफ होईल, शिवाय इतर किडेही बाथरूममध्ये येणार नाही.
मुलाखत देताना त त प प होते? ३ सोप्या गोष्टी, नोकरीसाठी सिलेक्शन होणारच
रोपांना बुरशी-कीड लागणार नाही
अनेक वेळा झाडांवर कीटक आणि बुरशीचा प्रादुर्भाव होतो. यावर आपण एक्सपायर्ड औषधांचा वापर करून पाहू शकता. खराब औषधे पाण्यात विरघळवून झाडांच्या मुळांमध्ये घाला. यामुळे झाडांची वाढ चांगली होईल आणि किडेही निघून जातील.