Join us  

मला माफ करा, माझे निधन झाले! कॅन्सरशी लढली पण सोशल मिडियात पोस्ट केली आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 11:58 AM

Brooklyn mom battling cancer accounces her own death on social media days before passing away : 'जर तुम्ही हे वाचत असाल तर याचा अर्थ माझे निधन झाले आहे' मृत्यूआधीच पोस्टद्वारे दिली निधनाची माहिती..

'खेळ कुणाला दैवाचा कळला'..हे गाणं आपण ऐकलंच असेल. या गाण्यातून हे कळतं की आपल्या आयुष्यात पुढे नक्की  काय घडेल हे सांगता येत नाही. मनुष्याच्या हातात इतर काही गोष्टी असू शकतात. पण जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतात. शिवाय जन्म आणि मृत्यू कधी-कोणत्या वेळी होईल हे सांगणंही कठीण आहे.

पण एका महिलेने मृत्यूपूर्वी, आपल्या मृत्यूसंदर्भातील पोस्ट सोशल मीडियात शेअर केली होती, त्यानंतर तिचा ओव्हेरियन कॅन्सरमुळे दुर्दैवी मृत्यूही झाला. सध्या तिची हृदय पिळवटून टाकणारी ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, तिच्या या पोस्टवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे(Brooklyn mom battling cancer accounces her own death on social media days before passing away).

नेमकं प्रकरण काय?

न्यू यॉर्कमधील ब्रुकलिनस्थित ३८ वर्षीय केसी मॅकइंटायरला, ओव्हेरियन कॅन्सर हा भयानक आजार झाला होता. तिचा १२ नोव्हेंबर रोजी या गंभीर आजारामुळे मृत्यूही झाला. मात्र, मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर फॅमिलीसहित फोटो शेड्यूल केले होते, व तिची ही पोस्ट तिच्या मृत्यूनंतर म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी पोस्ट झाले. तिने त्यात पती आणि २ मुलांसह काही फोटो शेअर केले आहे.

गिझरचा वापर करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; लाईट बिलही येईल कमी आणि शॉक लागण्याचा धोका नाही

फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या मित्रांसाठी एक नोट: जर तुम्ही हे वाचत असाल तर याचा अर्थ माझे निधन झाले आहे. मला माफ करा, आणि हे होणार होतं, व आम्हाला याची कल्पना होती. पूर्वी निदान झालेल्या ओव्हेरियन कॅन्सरमुळे मला या जगातून निरोप घ्यावा लागत आहे.'

ती पुढे म्हणते, 'मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करते, आणि तुम्ही देखील माझ्यावर तितकेच प्रेम करता, हे मला ठाऊक आहे. मित्र आणि परिवारासोबत रुग्णालयात घालवलेले ते ५ महिने माझ्यासाठी अविस्मरणीय ठरले.'

थोडं केसी मॅकइंटायरबद्दल..

आमीरशी ५ वर्षे अबोला, सलमानला लग्नाला नकार आणि शाहरुखची दोस्ती- हसऱ्या जुही चावलाची अनकही कहाणी

केसी मॅकइंटायरचा जन्म १ फेब्रुवारी १९८५ साली, मॅनहॅटन येथे झाला. तिने आपलं पुढील शिक्षण जॉर्जियामधील अॅग्नेस स्कॉट कॉलेजमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर ती प्रकाशक म्हणून पेंग्विन रँडम हाऊस या संस्थेसोबत कार्यरत होती. यासह तिने गायन आणि क्रिएटिव्ह रायटिंगचा विशेष अभ्यासही केला. २००७ साली तिने पदवी प्राप्त केली. २०१५ साली तिने अँड्र्यू ग्रेगरीशीसह लग्नगाठ बांधली. तर एप्रिल २०२२ साली त्यांच्या मुलीच्या वाढदिवसादरम्यान तिला ओव्हेरियन कॅन्सर झाल्याचे निदान झाले.

टॅग्स :कर्करोगसोशल व्हायरलसोशल मीडिया