सोशल मीडिया तुम्हाला प्रेम आणि भांडणांनी भरलेले अनेक व्हिडिओ आणि कथा पाहायला मिळतात. मग ते पती-पत्नीचे प्रेम असो किंवा भाऊ-बहिणीचे, वडील-मुलीचे किंवा आई-मुलाचे प्रेम. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मूल आपल्या रडणाऱ्या धाकट्या बहिणीला शांत करताना दिसत आहे. (Viral Video) मुल आपल्या बहिणीला प्रेमाने समजावत आहे आणि तिला मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.(Brother made a crying younger sister calm) हा व्हिडीओ एवढा गोंडस आहे की तो पाहिल्यानंतर तुमचंही मन भरून येईल. (Brother made a crying younger sister calm like this your heart will melt after watching the viral video)
जिस तरह ये भाई अपनी मायूस बहन को हिम्मत दे रहा है, वो बड़े-बड़ों के लिए सबक है.
— Dipanshu Kabra (@ipskabra) June 15, 2022
यदि हम भी इस बच्चे की तरह अपनों का ध्यान रखेंगे, तो वे #MentalHealth Issues से कभी नहीं हारेंगे. pic.twitter.com/Zu5he1vyLX
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक लहान मुलगी खूप रडत आहे आणि तिच्या मोठ्या भावाला समजावून सांगत आहे. भाऊ तिला मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पाहूनच कळतं की भावाचं आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे. त्यामुळेच स्वतः एवढा लहान असूनही तो आपल्या बहिणीला वडिलांप्रमाणे समजावण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो. भाऊ आणि बहिणीच्या या क्यूट व्हिडिओने सर्वांची मनं जिंकली आहेत.
आधी नवऱ्याला तिनं कानाखाली मारलं; त्यानं हात उचलताच 'अशी' रिएक्शन दिली, पाहा व्हिडिओ
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – 'हा भाऊ ज्या प्रकारे आपल्या निराश बहिणीला धीर देत आहे, तो मोठ्यांसाठी धडा आहे. जर आपणही या मुलाप्रमाणे आपल्या प्रियजनांची काळजी घेतली तर त्यांना कधीच #MentalHealth चा सामना करावा लागणार नाही.' . हा व्हिडिओ आतापर्यंत 33 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.