बहिण-भावाचे नाते आणि त्यांच्यातील बॉंडींग काय असते हे इतक कोणी सांगायची आवश्यकता नाही. ज्यांना बहिण आणि भाऊ असतात त्यांनाच ते चांगल्या पद्धतीने माहित असते. एक व्यक्ती आपल्या बहिणीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता. तेव्हा त्याला आतापर्यंतचे सर्वात मोठे सरप्राईज मिळाले आणि त्याला आपल्या भावना कंट्रोल करता आल्या नाहीत म्हणून तो ढसाढसा रडायला लागला. त्याचा रडण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आता बहिणीने अशी कोणती गोष्ट सांगितली असेल ज्यामुळे त्याला इतके रडू कोसळले असेल (Brother Sister Emotional Viral Video Sister Reveals her Secret on Video Call)?
हे दोघे बहिण-भाऊ व्हिडिओ कॉलवर एकमेकांशी बोलत असलेले आपल्याला दिसते. बहिण काहीतरी सांगते आणि भावाच्या डोळ्यात आनंदाने अचानक अश्रू यायला लागतात. तर आपण लवकरच मामा होणार असल्याचे बहिण त्याला सांगते आणि या व्यक्तीला आपले आनंदाश्रू अनावर होतात. व्हिडिओ कॉल सुरू असतानाच त्याला रडू कोसळते. त्याच्या भावना कॅमेरात परफेक्ट कैद झाल्या असून त्याच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला सहज दिसून येतो. मूल होणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि तितकीच नाजूक गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या जवळच्या लोकांशी शेअर करण्यासारखा दुसरा आनंद नाही.
आपली बहिण आई होणार आणि आपल्याला भाचा किंवा भाची होणार ही एका मामासाठीही तितकीच आनंदाची बाब असते. त्यामुळेच या मामाच्या डोळ्यात ही गोष्ट ऐकून आनंदाश्रू तरळले. इन्स्टाग्रामवर गुड न्यूज मूव्हमेंटस (Goodnews Movements) या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. आपल्या मोठ्या भावाला तो मामा होणार असल्याचे सांगताना ती, त्याची प्रतिक्रिया...तो क्षण...अमूल्य अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. ५ दिवसांत या व्हिडिओला ५० हजारहून अधिक लाईक्स आले असून अनेकांनी त्यावर आपले अनुभव प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत. मामा-भाच्याच्या नात्यावर आणि बहिण-भावांच्या बॉंडींगवर या प्रतिक्रियांमध्ये भाष्य करण्यात आले आहे.