Join us  

गुणाचा तो भाऊ! रस्त्यात पाणी भरलं तर छोट्याश्या बहिणीला पाठीवर घेत भावानं गाठलं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 1:10 PM

Brother's Love : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर पाणी तुंबलेले दिसत आहे. एक भाऊ आपल्या बहिणीला पाठीवर घेऊन रस्ता ओलांडत आहे.

भाऊ-बहिणीचं नातं प्रेमळ तितकंच खोडकर असते. भाऊ आपल्या बहिणीवर खूप प्रेम करतो आणि बहीण देखील आपल्या भावावर जीव ओवाळून टाकते.  भावंडांमध्ये भांडणेही खूप होतात ज्यामध्ये प्रेम, आदरही असतो. भाऊ आणि बहीण कधीच एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. (Brother's Love Video) कधी मित्र बनून तर कधी पालक बनून. भाऊ-बहिणीचे प्रेम नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असते. नुकताच एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचे डोळे पाणावतील. (There was water all around a brother told the world the meaning of rakshabandhan by making his sister sit on his back)

वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर पाणी तुंबलेले दिसत आहे. अशा स्थितीत एक भाऊ आपल्या बहिणीला पाठीवर  घेऊन रस्ता ओलांडायला लावत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ सांगतो की, परिस्थिती कितीही वाईट असली तरी भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो.

रिकामा डबा पाठवला तरी चालेल', मेसचं जेवण खाणाऱ्या लेकीच्या मैत्रिणीला काकूंनी लिहिलेलं पत्र पाहून व्हाल भावूक

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @DivakarReddyTPT नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. एका यूजरने म्हटले आहे - व्वा काय बात आहे, हा व्हिडिओ हृदयाला भिडला. त्याचवेळी, आणखी एका युजरने या व्हिडिओवर लिहिले आहे - प्रत्येकाला असा भाऊ मिळाला पाहिजे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया