सोशल मीडियावर नेहमीच लग्नाचे वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खळखळून हसवतात तर काही व्हिडिओ पाहून मन भावूक होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. असा प्रसंग तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. (Emotional Video) आपल्या दिवंगत वडिलांना अचानक लग्नाच्या दिवशी पाहून लेकीच्या मनाची झालेली अवस्था या व्हिडिओत टिपण्यात आली आहे. वडील मुलीच्या नात्यातील प्रेम दर्शवणारा हा व्हिडिओ आहे. (Bride surprised with wax statue of late father)
या व्हिडिओच्या सुरूवातीला एका व्यक्तीचा मेणाचा पुतळा अचानक समोर येतो आणि लग्नाच्या हॉलमध्ये उपस्थित सगळेचजण अवाक् होतात. त्याचवेळी नवरीचे लक्ष त्या वडीलांच्या पुतळ्याकडे जाते आणि तिला अश्रू अनावर होतात. जणू काही आपले वडिलच लग्नासाठी उपस्थित झाले असं त्या मुलीला वाटतं. त्यानंतर नवरदेव तिला सारवण्याचा प्रयत्न करतो. (Brother’s Surprise Gift to His Sister Wax Statue of Father at Daughter’s Wedding)
स्वतः शीच लग्न केलं तर काय झालं, असं मुलीने विचारताच आई म्हणाली...
लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईकही या काकांचा पुतळा पाहून भावूक होतात. आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. भावाकडून बहिणीला सरप्राईज गिफ्ट - वडिलांचा मेणाचा पुतळा असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. कमेंटमध्ये लोकांनी हे सगळ्यात सुंदर गिफ्ट असल्याचं म्हटलंय तर काहींनी हा व्हिडिओ हृदयस्पर्शी असल्याची कमेंट केली आहे.