Join us

घरच्यांना वाटले मुली किडनॅप झाल्या आणि मुली सापडल्या तर कुठं? थेट कोरियाच्या दिशेनं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2025 17:29 IST

BTS ARMY Girls faked kidnapping : १४ हजार रुपये घेऊन मुली निघाल्या बीटीएस बँडला भेटायला, घरच्यांची उडाली तारांबळ

आजकाल जगभरात कोरियन ड्रामाज, वेबसिरीज, गाणी, सिनेमा फार प्रसिद्ध आहेत.(BTS ARMY Girls faked kidnapping ) एवढंच नाही तर लोकांना नूडल्ससुद्धा कोरियनच खायला आवडतात. हे कोरीयन प्रेम तरुण पिढीत प्रचंड आहे. सध्या कोरियन ड्रामा जास्त लोकप्रिय आहेत. बी.टी.एस या कोरियन बँन्डबद्दल चाहत्यांमध्ये असलेले प्रेम तर अविश्वसनीय आहे.  जगभरात हे फॅन्स स्वत:ला बी.टी.एस आर्मी म्हणतात.(BTS ARMY Girls faked kidnapping ) आणि थोडेथोडके लोक नाही, तर करोडोच्या संख्येत जगभरातील लोक हा ट्रेंड फॉलो करतात. हे चाहते बँन्डमधील कलाकारांवर वेड्यासारखे प्रेम करतात. भारतातील तरुणांतही या बँन्डची लोकप्रियता प्रचंड आहे. खास करून मुलींमध्ये जास्त आहे. आणि काहीजणी त्यापायी वाट्टेल ते करायला तयार होतात. आपण सेलिब्रिटींच्या प्रेमापोटी चुकीची पावले उचलणारे लोक तर सतत बघतो. महाराष्ट्रातही एक असाच विचित्र प्रकार घडला. खरंतर घडला नाही घडवून आणला.

घडले असे की, धाराशीव जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली शाळेतून गायब झाल्या. त्यांचे अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाली. (BTS ARMY Girls faked kidnapping )धाराशीव पोलीसांना बातमी मिळताच त्यांनी तपास सुरू केला. एक मुलगी ११ तर दोघी जणी १३ वर्षाच्या आहेत. पोलीसांनी तपास करून मुलींना शोधून काढले आणि मुलींशी बोलल्यानंतर खरा प्रकार समोर आला. विविध बातम्यांमधून कळलेला तपशील रंजक आहे.खरेतर मुलींचे अपहरण वगैरे काहीही झाले नव्हते.(BTS ARMY Girls faked kidnapping ) या मुली पुण्याला जायला निघाल्या होत्या. मुलींकडे १४ हजार रुपये होते. पुण्याला जाऊन अजून पैसे कमवणार आणि कोरियाला जाणार असा बेत करून या तिघी पळाल्या होत्या. तीघी बीटीएस आर्मी ग्रुपच्या फॉलोवर आहेत. त्या बँन्डला भेटायला कोरियाला जायला निघाल्या होत्या. पोलीसांवर कपाळाला हात मारायची वेळ आली.

वेळीच मुलींचा शोध लागला नसता तर, त्यांच्या आयुष्याची गोळाबेरीज काहीतरी वेगळीच झाली असती.मुळात अल्पवयीन मुला-मुलींच्या डोक्यात असे विचार येतात याचे कारण काय? ऑनलाईन विश्वाची ओळख किंवा वापरण्याची परवानगी पालकांनी कोवळ्या वयातील पाल्यांना देणे चुकीचे आहे. समज येण्याआधी मुलांना मोबाईल किंवा इंटरनेट वापरायला देणे योग्य आहे का? या तिघीतर अल्पवयीन आहेत. पण तरुण मुलं-मुलीसुद्धा असे प्रकार करतच असतात. कुणी आवडणे समजू शकते पण असा टोकाचा मॅडनेस काळजी करायला लावणारच आहे, नाही का?

टॅग्स :महाराष्ट्रअपहरणपालकत्व