Lokmat Sakhi >Social Viral > Buffalo funny dance video : मालकिणीला डान्स करताना पाहून म्हशीनंही धरला ठेका; म्हशीचा डान्स पाहून पोट धरून हसाल

Buffalo funny dance video : मालकिणीला डान्स करताना पाहून म्हशीनंही धरला ठेका; म्हशीचा डान्स पाहून पोट धरून हसाल

Buffalo funny dance video : अनेकदा मनुष्य आणि प्राणी यांच्यात खोल प्रेम दिसून येते. प्रेमाची व्याख्या सांगणारे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात, ज्यामध्ये मालक आणि त्याच्या पाळीव प्राण्यांमधील प्रेमाचा अंदाज लावता येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:27 PM2022-09-20T18:27:40+5:302022-09-20T18:38:34+5:30

Buffalo funny dance video : अनेकदा मनुष्य आणि प्राणी यांच्यात खोल प्रेम दिसून येते. प्रेमाची व्याख्या सांगणारे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात, ज्यामध्ये मालक आणि त्याच्या पाळीव प्राण्यांमधील प्रेमाचा अंदाज लावता येतो.

Buffalo funny dance video buffalo started dancing with the girl video viral on social media | Buffalo funny dance video : मालकिणीला डान्स करताना पाहून म्हशीनंही धरला ठेका; म्हशीचा डान्स पाहून पोट धरून हसाल

Buffalo funny dance video : मालकिणीला डान्स करताना पाहून म्हशीनंही धरला ठेका; म्हशीचा डान्स पाहून पोट धरून हसाल

माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाला मजा, मस्ती करायची इच्छा असते. माणसांचे मौजमजेचे क्षण रोजच पाहायला मिळतात, पण प्राण्यांच्या आनंदात मौजमजा करण्याची शैली क्वचितच पाहायला मिळते, जी नक्कीच आश्चर्यकारक आहे. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद दिसेल आणि तुम्हालाही मस्तीमध्ये डान्स करावासा वाटेल.( Buffalo funny dance video buffalo started dancing with the girl video viral on social media)

अनेकदा मनुष्य आणि प्राणी यांच्यात खोल प्रेम दिसून येते. प्रेमाची व्याख्या सांगणारे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात, ज्यामध्ये मालक आणि त्याच्या पाळीव प्राण्यांमधील प्रेमाचा अंदाज लावता येतो. असे म्हणतात की पाळीव प्राणी मालकाच्या दुःखात आणि आनंदात सहभागी झालेले दिसतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून याचा अंदाज येऊ शकतो.

आपल्या मालकिणीला मजा करताना पाहून म्हैसही आनंदानं मजा करू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुढे मुलीसोबत म्हशीचा डान्स पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ खरोखरच मजेशीर आहे. व्हिडिओमध्ये म्हैस आपल्या मालकिणीची नक्कल करून उडी मारून नाचू लागते. दरम्यान, बॅकग्राऊंडमध्ये हे गाणेही ऐकू येते.

हा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @buitengebieden नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये म्हैस आपल्या मालकिणीशी एकरूप होऊन नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स विविध प्रतिक्रिया देऊन म्हशीच्या नृत्याचे कौतुक करताना थकलेले नाहीत.

Web Title: Buffalo funny dance video buffalo started dancing with the girl video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.