Join us  

म्हशीपुढे जाऊन रिल्स बनवणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:32 PM

Viral Video : काही व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात.  नुकताच व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हाला पोट धरून हसायला भाग पडेल.

इंटरनेटवर असे व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात, जे अनेकवेळा लोकांना हसायला लावतात. कधी लोकांची मजेदार गाणी, कधी मजेदार डान्स मूव्ह्स तुम्हाला आनंद देऊन जातात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये एका मुलीने म्हशीला चारा घालताना असे काही करायला सुरुवात केली. जे म्हशीला असह्य झाले आणि त्यानंतर जे घडले ते पाहून तुम्ही क्षणभरही हसू आवरू शकणार नाही. (Viral video of girl started dancing by giving fodder to buffaloes girl started dancing in front of buffalo)

काही व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात.  नुकताच व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हाला पोट धरून हसायला भाग पडेल. व्हायरल होत असलेल्या या मजेदार व्हिडिओच्या सुरुवातीला एक मुलगी बादलीत चारा घेऊन म्हशींच्या जवळ येते. दरम्यान, मुलगी तिथेच उभी राहून आवाजात म्हशीला चारा घालून नाचू लागते. हे सर्व तिथे उभ्या असलेल्या म्हशींना आवडत नाही आणि ती नाचणाऱ्या मुलीला जोरात मारते. इतक्यात म्हशीच्या धडकेने मुलगी जोरात आदळते. 

‘तिने’ ट्रकचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् केलं जबरदस्त ड्रायव्हिंग; कॉन्फिडन्स पाहून लोक म्हणाले...

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचे मनोरंजन होत आहे.  ज्या युजर्सनी व्हिडिओ पाहिला ते त्यावर उत्स्फूर्तपणे कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 21 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया