Lokmat Sakhi >Social Viral > थंड की गरम? कोणते पाणी आधी गोठेल? नक्की खरं काय? लवकर बर्फ हवा असेल तर..

थंड की गरम? कोणते पाणी आधी गोठेल? नक्की खरं काय? लवकर बर्फ हवा असेल तर..

Can hot water freeze faster than cold water : गरम पाणी थंड पाण्यापेक्षा जलदरित्या गोठते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 08:50 PM2024-04-24T20:50:10+5:302024-04-24T20:50:57+5:30

Can hot water freeze faster than cold water : गरम पाणी थंड पाण्यापेक्षा जलदरित्या गोठते का?

Can hot water freeze faster than cold water? | थंड की गरम? कोणते पाणी आधी गोठेल? नक्की खरं काय? लवकर बर्फ हवा असेल तर..

थंड की गरम? कोणते पाणी आधी गोठेल? नक्की खरं काय? लवकर बर्फ हवा असेल तर..

उन्हाचा पारा वाढला की, आपल्याला सतत थंड वातावरणात राहण्याची आणि थंड पेय पिण्याची इच्छा होते (Summer Special). शरीराला उन्हाचे चटके बसल्यावर आपण फ्रिजमधलं पाणी गटागटा पितो. फ्रिजमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी आपण बॉटलचा वापर करतो. त्यात पाणी साठवून आपण पाणी थंड होण्यापर्यंत वाट पाहतो. किंवा फ्रिजरमध्ये आईस ट्रे मध्ये पाणी भरून बर्फ गोठवण्यासाठी ठेवतो. पण बर्फ असो किंवा पाणी फ्रिजमध्ये लवकर थंड होत नाही. निदान ३० मिनिटं किंवा तासभर आरामात लागतात. पण फ्रिजरमध्ये बर्फ लवकर फ्रीज व्हावे असे वाटत असेल तर, थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करा(Can hot water freeze faster than cold water?).

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अहवालानुसार, थंड पाण्याऐवजी गरम पाणी बर्फात आधी रुपांतरीत होईल. याचे कारण असे आहे की, जेव्हा पाणी गरम असते तेव्हा ते थंड पाण्यापेक्षा वेगाने बाष्पीभवन होते. बाष्पीभवनामुळे कूलिंग इफेक्ट निर्माण होतात. ज्यामुळे पाणी लगेच थंड होते, व गरम पाण्याचा लगेच बर्फ होतो.'

लिंबाचे झाड वाढतच नाही? कुंडीतल्या मातीत मिसळा एक फुकट मिळणारी गोष्ट; रसाळ लिंबू हवेत तर..

अशुद्धतेमुळे थंड पाण्याला वेळ लागतो

पाणी गरम केल्यामुळे, काही रेणू पृष्ठभागावर येतात आणि थंड पाण्याचे रेणू खाली राहतात. यामुळे पाणी थंड होण्याची प्रक्रिया वेगवान होते. आणि बर्फ लवकर गोठतो. थंड पाण्यात असलेल्या वायू आणि अशुद्धतेमुळे थंड पाणी गोठण्यास वेळ घेते.

तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही

हायड्रोजन बाँड

हायड्रोजन बाँडमुळेही बर्फ गोठ्ण्यास मदत होते. पाण्यातील हायड्रोजन बाँड विविध रेणूंना संपर्कात आणतात, आणि त्यांना एकत्र आणतात. पण गरम होताच ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या अणूंमध्ये निर्माण झालेला बंध तुटतो. हायड्रोजन बाँडच्या विस्तारामुळे पाण्याचे रेणू एकमेकांपासून दूर जातात, ज्यामुळे ऊर्जा कमी होते आणि पाणी लवकर गोठते. त्यामुळे थंडऐवजी गरम पाणी कधीही गोठवण्यासाठी उत्तम.

Web Title: Can hot water freeze faster than cold water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.