कुकर ही आपल्या रोजच्या स्वयंपाक घरातील सगळ्यांत महत्वाची गोष्ट आहे. रोजचा स्वयंपाक करायचा म्हटलं तर कुकरशिवाय आपलं कामच होत नाही. डाळ, भात किंवा एखादी भाजी करायची म्हटलं किंवा खिचडी जरी करायची म्हटलं तर लगेच कुकर लावला की काम होत. आजकाल बाजारांत वेगवेगळ्या प्रकारचे कुकर मिळतात. या कुकरची झाकण देखील वेगवेगळ्या आकाराची आणि साईजची असतात.
आपल्यापैकी प्रत्येक भारतीयांच्या घरात एक कुकर नक्कीच असतो. ज्याचे झाकण लावताना आपल्याला नाकी नऊ येतात. या अशा कुकरचे झाकण लावणे म्हणजे काही गृहिणींच्या डोक्याला तापचं असतो. त्या कुकरचे झाकण लागता लागत नाही आणि झाकण उघडायचे म्हटलं तर निघता निघत नाही. या अशा कुकरचे झाकण लावणे, काढणे म्हणजे डोक्याला ताप असतो. परंतु हे झाकण एका हाताने उघडता आले तर, परंतु असे सहज शक्य होईलच असे नसते. भारतात राहणार्या कॅनेडियन ब्लॉगरने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो एका हाताने प्रेशर कुकर उघडताना दिसत आहे. बघूया नेमकं काय आहे प्रकरण...
नेमकं प्रकरणं काय आहे ?
भारतात राहणार्या कॅनेडियन ब्लॉगरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो एका हाताने प्रेशर कुकर उघडताना दिसत आहे. भारतातली मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. इथे प्रत्येक देशांतून, राज्यांतून लोक आपली स्वप्न पूर्ण करायला येतात. कॅलेब फ्रिसन (Caleb Friesen) हा त्यापैकीच एक आहे. तो कॅनेडियन असून गेल्या सहा वर्षांपासून भारतात राहत आहे. तो “भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमबद्दल व्हिडिओ बनवत आहे.” अलीकडेच, त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो एका हाताने प्रेशर कुकर उघडताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आईची तक्रार करायची म्हणून ११ वर्षांचा मुलगा २४ तास सायकल चालवत गेला.. कुठे? वाचा...
कॅलेब फ्रिसनने नुकताच त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो एका कुकरमध्ये भात शिजवत आहे. भात शिजवून झाल्यानंतर जेव्हा कुकर उघडण्याची वेळ येते तेव्हा तो चक्क एका हाताने कुकरचे झाकण उघडत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना त्याने या व्हिडिओला साजेसे असे कॅप्शन देखील दिले आहे. कॅलेब फ्रिसन व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हणतो की, "जवळपास ६वर्षे भारतात राहिल्यानंतर, मी शेवटी हे करु शकलो आहे. मी एका हाताने प्रेशर कुकर उघडू शकतो!" क्लिपमध्ये तो एका हाताने कुकरच्या भांड्याचे झाकण फक्त उघडत नाही तर ते बंदही करत आहे.
नेटकरी काय म्हणत आहेत ?
हा व्हिडिओ १८ एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला होता. शेअर केल्यापासून, या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय, या पोस्टला जवळपास ८०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ शेअर करताना लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. हा व्हिडीओ पाहून एका युजरने म्हटले आहे की, "हे असे कौशल्य आहे जे ९९.९९% भारतीयांना अद्याप जमले नाही. एका नेटकाऱ्याने कॅलेबचे अभिनंदन करत मी हे कुकरचे झाकण कधी दोन्ही हातांनी देखील लावू शकलो नाही, ते तुम्ही करुन दाखवले याबद्दल अभिनंदन. एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की," व्वा! हे तर खूपच भारी आहे बरेच भारतीय देखील हे स्पष्टपणे करू शकतात याची खात्री देऊ शकत नाही."