Join us  

सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 9:01 PM

How does one clean one's mirrors and side windows in the middle of a drive when it's raining? : पावसाळयात गाडीच्या काचा व आरसे कितीही पुसले तरीही धुरकटच दिसतात, एक सोपी ट्रिक... आता बिनधास्त निघा भर पावसात भटकायला !!

सध्या पावसाळा सुरु झाला आहे. या धो - धो कोसळणाऱ्या पावसाचा आनंद सगळ्यांनाच घ्यावासा वाटतो. मग पावसाळ्यात मस्त फिरायला किंवा ट्रेकिंगला जाण्याचे बेत आखले जातात. मग एक दिवस आपण आपले मित्र - मैत्रिणी, परिवारासोबत गाडी घेऊन फिरायला बाहेर पडतो. अशावेळी आपण गाडी घेऊन फिरायला तर निघतो परंतु रस्त्यांत साचलेल पाणी, मुसळदार पडणारा पाऊस या सगळ्याचा आनंद एका मर्यादेपर्यंत चांगला वाटतो परंतु नंतर काहीवेळा त्याची भीती वाटू लागते. 

पावसाळा सुरु झाला की गाड्यांची काळजी घेण आवश्यक असत नाहीतर ते पुढे जास्त खर्चिक बनतं. पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी साचते त्यामुळे गाडी चालवणे अवघड बनतं. यासोबतच गाडीचेही बऱ्याचदा नुकसान होते. अशा परिस्थितीत पावसाळ्यात गाडीची काळजी घेणे खूप महत्वाचे असते, तसेच आपल्या  गाडीची कंडिशनसुद्धा चांगली असायला हवी. पावसाळ्यात गाडी चालवताना अनेक प्रॉब्लेम येतात. भरपूर पाऊस पडत असताना गाडीच्या काचांवर व पुढच्या दोन्ही आरशावर सतत पाणी पडत असते. या सततच्या पडणाऱ्या पाण्यामुळे गाडी चालवताना आपल्याला धुरकट दिसू लागते. अशावेळी नेमकं काय करावं यावर एक सोपा घरगुती उपाय करुन पाहू(Car Mirrors Foggy During the Rainy Season? Use This Method To Clear Up Foggy Mirrors!)

पावसाळ्यात गाडीच्या काचांवर व आरशावर पडणाऱ्या पाण्यामुळे धुरकट दिसू लागते ? 

पावसाळयात गाडी चालवताना किती समस्या येतात हे त्या ड्रायव्हर सीटवर बसणाराच व्यक्ती सांगू शकतो. कधी गाडी चालवताना धो - धो कोसळणारा पाऊस, रस्त्यातील पाण्याने साचलेले खड्डे, ओल्या चिंब रस्त्यावरून गाडी नीट सांभाळत चालवणे, गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसणे अशा अनेक समस्या येतात. परंतु गाडी चालवताना काचेवर आणि आरशावर साचलेल्या पाणयामुळे समोरचे काहीच दिसेनासे होते, तेव्हा खरी घाबरगुंडी उडते. यासाठी काचेवरचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी आपण वायपरचा वापर करतोच.

परंतु याच्या सोबतीलाच आपण एक सोपा घरगुती उपाय करु शकतो. ज्यामुळे गाडीच्या काचा व आरसे यावर पाणी न साचून राहता आपण त्यात स्पष्टपणे पाहू शकतो. इन्स्टाग्रामवर एका पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्यामध्ये एक व्यक्ती ही अतिशय सोपी पण महत्त्वाची ट्रिक आपल्याशी शेअर करतो. त्यामुळे पावसाळ्यातील एक महत्त्वाची समस्या दूर होण्यास मदत होते.

पावसाळ्यात महिलांना होणारा ब्रेस्ट इन्फेक्शनचा त्रास कसा टाळायचा? पाहा कारणे आणि उपाय...  

पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

गाडीच्या काचेवर आणि आरशावर पावसाचे पाणी टिकून राहू नये म्हणून एक कच्चा बटाटा सालीसकट दोन भागांमध्ये कापून घ्यावे. या कच्च्या बटाट्याचे २ तुकडे करून घ्यावेत. आता बटाट्याचा तुकडा घेऊन तो काचेवर, आरशावर तसेच समोरच्या विंडशिल्डवर २ ते ३ मिनिटे घासून घ्यावा. त्यानंतर ते तसेच राहू द्यावे. आता मस्त बिनधास्त प्रवास करण्यासाठी निघा. या सोप्या झटपट घरगुती उपायामुळे पावसाळयात गाडीच्या काचेवर, आरशावर पावसाचे पडणारे पाणी टिकून राहणार नाही व आपल्याला स्पष्ट दिसण्यास मदत होईल.

 

टॅग्स :सोशल व्हायरल