आजच्या घडीला बरेच जण नौकरी (Social Viral) करतात. प्रत्येक कंपनीमध्ये कामगारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आमलात आणल्या जातात. यामुळे कामगारांचा मानसिक ताण - तणाव बऱ्यापैकी कमी होतो (Dating). बहुतांश योजना या कामाच्या निगडीत असतात (Relationship). पण कधी डेटिंगच्या निगडीत उपक्रमाबद्दलबद्दल ऐकून होतात का? अनेक चीनी कंपन्या आपल्या विविध घोषणांमुळे आणि योजनांमुळे चर्चेत असतात. यातच एका कंपनीने केलेली अनोखी घोषणा चर्चेत आली आहे.
एका चीनी कंपनीने आपल्या कामगारांसाठी नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येत आहे. शिवाय यासाठी कंपनी चक्क कर्मचाऱ्यांना पैसे देत आहे. कुठली आहे ही कंपनी? त्यांनी राबवलेला उपक्रम व्हायरल का होत आहे?(Cash rewards for dating? This Chinese tech company offers incentives to employees to go on dates).
फ्लॉवरमधील कीड - अळ्या निघतील चटकन; कोमट पाण्यात घाला १ पिवळा मसाला; चटकन अळ्या बाहेर
चीनी कंपनीच्या उपक्रमाची जगभर चर्चा
चीनी कंपनी नेहमी आपल्या आगळ्या - वेगळ्या उपक्रमासाठी ओळखले जातात. अशातच इन्स्टा ३६० या कंपनीने केलेल्या उपक्रमाची चर्चा होत आहे. इन्स्टा ३६० ही एक चीनमधील शेन्झेनस्थित एक तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीने नुकतंच कर्मचाऱ्यांसाठी डेटिंग कार्यक्रम सुरु केला आहे.
वाटीभर मेथी दाण्यांचे करा पौष्टीक लाडू, कडू अजिबात होणार नाही; हिवाळ्यात दुखण्यांपासून राहाल लांब
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, कंपनीबाहेरील व्यक्तीची ओळख करून घेणाऱ्या कर्मचाऱ्याला ६६ युआन (सुमारे ७७० रुपये) मिळतात. जर कर्मचारी डेट करत असेल तर, कर्मचारी आणि त्याच्या जोडीदाराला अशा दोघांनाही १,००० युआन (सुमारे ११,७०० रुपये) मिळतात. परंतु, रिलेशनशिप ३ महिने पूर्ण झालेले पाहिजे.
अजब उपक्रम राबवण्यामागे कारण काय?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, चीनी कंपनी असे उपक्रम का राबवत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे, विवाह आणि जन्मदर घसरणे. २०२४ च्या पहिल्या तीन तिमाहीत, चीनमध्ये केवळ ४.७४ दशलक्ष जोडप्यांनी विवाहांची नोंदणी केली होती. तर, गेल्या वर्षी ५.६९ दशलक्ष विवाहांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.६% ची घट झाली आहे. त्यामुळे विवाह आणि जन्मदर वाढावा म्हणून कंपनीने हा निर्णय घेतलं असल्याचं सांगितलं.