Lokmat Sakhi >Social Viral > प्रेशर कुकर वापरताना विसरु नका ४ गोष्टी, चुकलं तर होईल कुकरचा स्फोट-जीवाला धोका

प्रेशर कुकर वापरताना विसरु नका ४ गोष्टी, चुकलं तर होईल कुकरचा स्फोट-जीवाला धोका

Causes of Pressure Cooker Explosions and How to Avoid Them प्रेशर कुकर आपण रोज वापरतो पण त्याचा सुरक्षित वापर अनेकांना माहितीच नसतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2023 10:40 AM2023-09-05T10:40:44+5:302023-09-05T10:45:02+5:30

Causes of Pressure Cooker Explosions and How to Avoid Them प्रेशर कुकर आपण रोज वापरतो पण त्याचा सुरक्षित वापर अनेकांना माहितीच नसतो

Causes of Pressure Cooker Explosions and How to Avoid Them | प्रेशर कुकर वापरताना विसरु नका ४ गोष्टी, चुकलं तर होईल कुकरचा स्फोट-जीवाला धोका

प्रेशर कुकर वापरताना विसरु नका ४ गोष्टी, चुकलं तर होईल कुकरचा स्फोट-जीवाला धोका

डाळ - भात व्यतिरिक्त आपण प्रेशर कुकरमध्ये अनेक पदार्थ शिजवतो. आजकाल लोकं प्रेशर कुकरमध्ये पुलाव, मिक्स भाजी यासह विविध गोष्टी तयार करतात. जस जसं काळ बदलत चालला आहे, त्याप्रमाणे प्रेशर कुकरमध्ये देखील विविध प्रकार दिसून येतात. भारतातातील प्रत्येक घरात आपल्याला प्रेशर कुकर सापडेल.

मात्र, प्रेशर कुकरमध्ये जेवण तयार करताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नकळत घडणाऱ्या गोष्टींमुळे प्रेशर कुकरचा अनेकदा स्फोट होतो. त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली बरी. प्रेशर कुकर वापरण्यापूर्वी दररोज कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, याची माहित घेऊयात. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात टाळता येऊ शकतो(Causes of Pressure Cooker Explosions and How to Avoid Them).

ओव्हरलोड करू नका

प्रेफर्डम्‍यूचुअल या वेबसाईटनुसार, प्रेशर कुकरमध्ये आपण सहसा भात - डाळ तयार करतो. कारण कमी वेळात डाळ - भात परफेक्ट शिजते. मात्र, प्रेशर कुकर जास्त भरला जाणार नाही याची काळजी घ्या. तांदूळ, डाळी, भाज्या इत्यादी पदार्थ तयार करताना, प्रेशर कुकर अर्ध्यापेक्षा जास्त भरला जाणार नाही, हे तपासून घ्या. कारण दाब वाढल्याने प्रेशर कुकरचा स्फोट होऊ शकतो.

केळी लवकर खराब होऊ नयेत, काळी पडू नयेत म्हणून २ टिप्स, केळी राहतील ताजी

प्रेशरविना झाकण उघडू नका

अन्न शिजल्यानंतर लगेच प्रेशर कुकरचं झाकण उघडू नका. यामुळे स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रथम, कुकरच्या शिट्टीमधून बाहेर हवा रिलीज करून घ्या, त्यानंतर कुकरचं झाकण उघडा.

प्रेशर कुकरचा वापर करताना या गोष्टी तपासा

प्रेशर कुकरचा वापर करताना प्रथम त्याची शिट्टी, सेफ्टी व्हॉल्व्ह तपासा. व त्यात कुठेही ब्लॉक आहे की नाही हे चेक करा. प्रेशर कुकर नेहमी साफ करून वापरा. शिवाय प्रेशर कुकरमधील गॅस्केट सैल झाली असेल तर, त्वरित चेंज करा. यामुळे देखील प्रेशर कुकरचा स्फोट होऊ शकतो.

१ वाटी चणाडाळीची करा साऊथ इंडियन पद्धतीची चटणी, डोसे - आप्पेसाठी स्पेशल चटणी

एक्‍सपायरी डेट चेक करा

प्रेशर कुकर खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट चेक करा. एक्‍सपायरी डेट जवळ आल्यास प्रेशर कुकर वापरणे टाळा. दर ५ वर्षांनी प्रेशर कुकर बदलत राहा.

Web Title: Causes of Pressure Cooker Explosions and How to Avoid Them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.