Lokmat Sakhi >Social Viral > सेलेना जेटली म्हणते लहानपणीच आला खूप घाणेरडा अनुभव पण तरीही 'ते' निर्दोष आणि मी मात्र.... 

सेलेना जेटली म्हणते लहानपणीच आला खूप घाणेरडा अनुभव पण तरीही 'ते' निर्दोष आणि मी मात्र.... 

Celina jaitly Reveals About Her Harassment In School Days: अभिनेत्री सेलेना जेटली हिने तिची आपबिती नुकतीच सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे, बघा ती काय सांगते... (Celina jaitly Reveals About Her Harassment In School Days)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2024 05:49 PM2024-08-19T17:49:48+5:302024-08-19T17:50:47+5:30

Celina jaitly Reveals About Her Harassment In School Days: अभिनेत्री सेलेना जेटली हिने तिची आपबिती नुकतीच सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे, बघा ती काय सांगते... (Celina jaitly Reveals About Her Harassment In School Days)

celina jaitly shared her harassment experience from her school days and said THE VICTIM IS ALWAYS AT FAULT | सेलेना जेटली म्हणते लहानपणीच आला खूप घाणेरडा अनुभव पण तरीही 'ते' निर्दोष आणि मी मात्र.... 

सेलेना जेटली म्हणते लहानपणीच आला खूप घाणेरडा अनुभव पण तरीही 'ते' निर्दोष आणि मी मात्र.... 

Highlightsजिच्यावर अन्याय होतो, तिच्याकडेच बोट दाखवलं जातं. पण ज्याच्या नजरेत, वागण्यात दोष असतो, त्याला मात्र मोकाट सोडलं जातं.. त्याला कोणीही जाब विचारत नाही.

कोलकाता येथील डॉक्टरची मर्डर केस उघडकीस आली आणि अख्खा देश हादरून गेला. जिवाचा थरकाप उडविणारा तो प्रकार होता. या घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही बोलते झाले आहेत. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री सेलेना जेटली. कोलकाता मर्डर केसचा संदर्भ देत सेलेनाने एक भली मोठी पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने लहानपणीच तिला आलेले काही घाणेरडे अनुभव शेअर केले असून त्यासाठी प्रत्येकवेळी तिलाच कसं दोषी ठरविण्यात आलं ते सांगितलं आहे. सेलेना जे काही सांगते आहे, तसा अनुभव प्रत्येक मुलीने कधी ना कधी घेतलाच असणार...(Celina jaitly Reveals About Her Harassment In School Days)

 

सेलेना म्हणते ती सहावीत असताना काही टारगट मुलं तिचा पाठलाग करायचे, ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती तर तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी तिच्यावर दगडं फेकले, एकाने तर तिला प्रायव्हेट पार्ट दाखवले. पण याबाबतची तक्रार करायला ती जेव्हा शिक्षकांकडे गेली तेव्हा तिचाच दोष म्हणून तिला गप्प बसविण्यात आले.

डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

असा अनुभव घेणारी सेलेना एकटीच नाही. जेव्हा कधीही एखाद्या मुलीला असा घाणेरडा अनुभव येतो, तेव्हा ती स्वत:च हे सगळं ओढवून घ्यायला कशी जबाबदार आहे, हे तिला दाखवून दिलं जातं. तिच्या कपड्यांना, तिच्या दिसण्याला, तिच्या मुक्तपणे बिंधास्त वागण्याला दोष दिला जातो. जिच्यावर अन्याय होतो, तिच्याकडेच बोट दाखवलं जातं. पण ज्याच्या नजरेत, वागण्यात दोष असतो, त्याला मात्र मोकाट सोडलं जातं.. त्याला कोणीही जाब विचारत नाही.

 

तेच सेलेनाच्या बाबतीत झालं. तिच्या शिक्षकांनी तिला ऐकवलं की तु इतर मुलींसारखी केसांना तेल लावून, वेण्या घालून येत नाहीस, तुझे कपडे घट्ट असतात म्हणून तुला असा त्रास होतो.

ना कोणतं फेसपॅक ना फेशियल; 'या' पद्धतीने ओढा तुमचे कान- चेहरा होईल एकदम चमकदार 

त्यामुळे या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस, हे तिच्या मनावर ठसविण्यात आलं. ही मानसिकता कधी बदलणार, मुलींवर जसे संस्कार करता, त्यांना कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवता तसं मुलांना कधी सांगणार... जेव्हा मुलींप्रमाणेच मुलांवरही वागण्याची, बोलण्याची बंधनं येतील, तेव्हाच कदाचित अशा घटनांसाठी मुलींना दोषी धरणं कमी होईल.. 


 

Web Title: celina jaitly shared her harassment experience from her school days and said THE VICTIM IS ALWAYS AT FAULT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.