Lokmat Sakhi >Social Viral > घेणार का चॅलेंज? ८ किलोचा बाहुबली सामोसा खा आणि ५१ हजारांचं बक्षिस मिळवा, व्हिडिओ व्हायरल

घेणार का चॅलेंज? ८ किलोचा बाहुबली सामोसा खा आणि ५१ हजारांचं बक्षिस मिळवा, व्हिडिओ व्हायरल

Viral Video of Bahubali Samosa: सामाेसा खूप आवडत असेल आणि खरोखरच सामोस्याचे चाहते असाल, तर हे चॅलेंज स्विकारू शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 05:00 PM2022-10-29T17:00:16+5:302022-10-29T17:01:41+5:30

Viral Video of Bahubali Samosa: सामाेसा खूप आवडत असेल आणि खरोखरच सामोस्याचे चाहते असाल, तर हे चॅलेंज स्विकारू शकता.

Challenge for foodies: Finish this Bahubali Samosa of 8 kg and win 51 thousand cash prize | घेणार का चॅलेंज? ८ किलोचा बाहुबली सामोसा खा आणि ५१ हजारांचं बक्षिस मिळवा, व्हिडिओ व्हायरल

घेणार का चॅलेंज? ८ किलोचा बाहुबली सामोसा खा आणि ५१ हजारांचं बक्षिस मिळवा, व्हिडिओ व्हायरल

Highlightsखरे सामोसा प्रेमी असाल तर हे चॅलेंज स्विकारा आणि तब्बल ८ किलोचा हा बाहुबली सामोसा खाऊन दाखवा.

सामोसा म्हणजे अनेक जणांचा आवडीचा पदार्थ. साधारणपणे १० ते १५ रुपयांना मिळणारा हा चटकदार पदार्थ खाल्ला की मन आणि रसना दोन्हीही तृप्त होऊन जातात. एका व्यक्तीला एकावेळी एक सामोसा (samosa lover) खाणे अजिबातच अवघड नाही. कारण साधारणपणे तळहातावर अगदी सहज मावेल, असा सामोस्याचा आकार असतो. पण सोशल मिडियावर सध्या व्हायरल (Viral Video of Bahubali Samosa) झालेल्या या सामोस्याची तर गोष्टच वेगळी आहे. खरे सामोसा प्रेमी असाल तर हे चॅलेंज स्विकारा आणि तब्बल ८ किलोचा हा बाहुबली सामोसा (Bahubali Samosa) खाऊन दाखवा.

 

हा सामोसा खरोखरच अगदी नावाप्रमाणेच अगडबंब आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका दुकानात हा बाहुबली सामोसा मिळतो. या सामोस्याची खासियत म्हणजे त्याचं वजन तब्बल ८ किलो असून त्याची किंमत ११०० रुपये आहे. त्याचा आकार पाहिला तर ८ ते १० जणांनी पोटभर खाल्ला तरी तो संपायचा नाही, असं वाटतं. उद्योजक हर्ष गोयंका यांनी या सामोस्याचा व्हिडिओ ट्विटर हॅण्डलवर शेअर केला असून "After all the Diwali sweets, my wife has ordered me to eat not more than one samosa today……" असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.

 

या सामोस्याविषयी आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे हा सामोसा ज्या हलवाईच्या दुकानात मिळतो, त्यांनी सामोसा खाणाऱ्या प्रत्येक खवय्यासाठी एक चॅलेंज ठेवलं आहे. जो कुणी हा भव्य सामोसा अर्ध्या तासांत संपवेल, त्याला त्या दुकानदाराकडून तब्बल ५१ हजार रुपयांचं बक्षिस देण्यात येईल. बघा जर तुम्ही खरोखरच सामोसा प्रेमी असाल, तर एकदा हे चॅलेंज स्विकारून बघायला हरकत नाही. 

 

Web Title: Challenge for foodies: Finish this Bahubali Samosa of 8 kg and win 51 thousand cash prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.