Join us  

जळकट - काळपट भांडी साबणाशिवाय स्वच्छ कशी करावी? लिंबाच्या रसाचा सोपा उपाय; मिनिटात भांडी चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2024 2:08 PM

Charcoal for Cleaning Utensils : जळकट भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा सोपा उपाय

स्वयंपाक करताना एकावेळी महिलांना बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात (Cleaning Tips). स्वयंपाक केल्यानंतर भांडी घासणं अवघड काम वाटतं (Charcoal). अनेकदा पदार्थ करताना गॅस गरजेपेक्षा मोठा होतो किंवा मग थोडं दुर्लक्ष झाल्याने कढईतला पदार्थ जळून तळाला लागतात. अशी जळकट भांडी स्वच्छ करणं कठीण काम वाटतं (Kitchen Tips).

स्टीलची किंवा इतर धातूची जळाली तर, घासणं अवघड होऊन जातं. जर काळीकुट्ट भांडी घासूनही स्वच्छ होत नसतील तर, कोळश्याचा वापर करून पाहा. गावाकडे आपण पाहिलं असेल कोळश्याचा वापर भांडी घासण्यासाठी होतो. ज्यामुळे भांडी झटक्यात स्वच्छ होतात. जर आपण देखील काळीकुट्ट पडलेल्या भांड्यांमुळे त्रस्त असाल तर, कोळश्याचा वापर करून पाहा. साबणाशिवाय भांडी स्वच्छ होतील(Charcoal for Cleaning Utensils).

काळीकुट्ट भांडी स्वच्छ करण्यासाठी कोळश्याचा करा 'असा' वापर

लागणारं साहित्य

कोळसा

व्यायामाला वेळ नाही-तोंडावरही ताबा नाही? झोपण्यापूर्वी ५ गोष्टी करा; काही न करता वजन घटेल

लिंबाचा रस

या पद्धतीने भांडी घासण्यासाठी कोळश्याचा करा वापर

सर्वात आधी काळपट पडलेली भांडी स्वच्छ धुवून घ्या. एका वाटीमध्ये कोळसा घ्या. कोळश्याची पावडर तयार करा. त्यात लिंबाचा रस मिक्स करा.

तयार पेस्ट काळपट पडलेल्या भांड्याला लावून घासणीने घासा, मेहनत न घेता भांडी स्वच्छ होतील. शेवटी पाण्याने भांडी धुवा. यामुळे भांडी स्वच्छ होतील. आपण कोळश्याच्या वापराने कोणतीही भांडी स्वच्छ करू शकता. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स