Lokmat Sakhi >Social Viral > कोण म्हणते चिअर गर्लचे काम सोपे असते? हाताला प्लास्टर बांधून 'ती' मॅचला हजर.. कामावर प्रेम असावे ते असे..

कोण म्हणते चिअर गर्लचे काम सोपे असते? हाताला प्लास्टर बांधून 'ती' मॅचला हजर.. कामावर प्रेम असावे ते असे..

Cheerleader Performs Despite Suffering Arm Injury, Picture of her Dancing With Arm Sling During GT vs SRH IPL 2023 Match Goes Viral : आपले काम आपल्याला प्यारे असेल तर सगळे कष्ट सोपे होतात, IPL चिअर गर्ल हेच तर सांगतेय...

By प्रियांका निर्गुण. | Published: May 17, 2023 07:48 PM2023-05-17T19:48:03+5:302023-05-17T20:57:28+5:30

Cheerleader Performs Despite Suffering Arm Injury, Picture of her Dancing With Arm Sling During GT vs SRH IPL 2023 Match Goes Viral : आपले काम आपल्याला प्यारे असेल तर सगळे कष्ट सोपे होतात, IPL चिअर गर्ल हेच तर सांगतेय...

Cheerleader dances with broken hand during GT vs SRH clash, pic goes viral | कोण म्हणते चिअर गर्लचे काम सोपे असते? हाताला प्लास्टर बांधून 'ती' मॅचला हजर.. कामावर प्रेम असावे ते असे..

कोण म्हणते चिअर गर्लचे काम सोपे असते? हाताला प्लास्टर बांधून 'ती' मॅचला हजर.. कामावर प्रेम असावे ते असे..

प्रियांका निर्गुण - जाधव.

क्रिकेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ते भलं मोठं स्टेडियम, गच्च भरलेली गर्दी, चौकार, षटकार, बॅट्समनने पूर्ण केलेली शतक, आणि बरंच काही. या सगळ्यांबरोबरच या खेळाची मजा वाढवण्यासाठी आपल्याला चिअर लिडर्स मुली देखील स्टेडियममध्ये पहायला मिळतात. चिअर लिडर्स या नावावरूनच त्यांची ओळख केली जाते. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी थोडक्यात त्यांना चिअर करण्यासाठी या चिअर लिडर्स असतात. या चिअर लिडर्स आपल्या हातात रंगीबेरंगी  झिरमिळ्यांचा गुच्छ घेऊन स्टेडियमच्या एका कोपऱ्यांत नाचताना दिसतात. या चिअर लिडर्स नाचून, तसेच हातांतील झिरमिळ्यांचा गुच्छा नाचवत प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करण्यासोबतच खेळाडूंचा ताण कमी करुन त्यांना अधिकाधिक उत्तम खेळण्यासाठी प्रवृत्त करणे हे त्यांचे मुख्य काम असते. या चिअर लिडर्स आपले काम चोख बजावत असतात. 

मध्यंतरी या चिअर लिडर्सनी घातलेल्या तोकड्या कपड्यांवरुन आणि चित्रविचित्र डान्सवरुन त्यांच्यावर टिका - टिप्पणी करण्यात येत होती. परंतु कितीही झाले तरीही या चिअर लिडर्स न कळतपणे क्रिकेट या खेळाचा एक भाग आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिअर लिडर्सच्या कामगिरीचे नेटकऱ्यांकडून कौतुक होताना दिसत आहे. प्रत्येकजण आपल्या कामाच्या बाबतीत किंवा आवडीनिवडीच्या संदर्भात एकनिष्ठ असतो. काम कोणतेही असो आपण ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा व त्या प्रती आपली जबाबदारी निभावून नेण्याचा सतत प्रयत्न करत असतो. अशीच एक चिअर लिडर आपल्या कामाच्या प्रती आदर बाळगताना व आपले काम आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसून येत आहे. तिच्या या कामाचे व कामाच्या प्रती असणाऱ्या एकनिष्ठतेचे नेटकऱ्यांमध्ये कौतुक होताना दिसत आहे(Cheerleader dances with broken hand during GT vs SRH clash, pic goes viral).

चिअर लिडरने नेमकं केलं तरी काय ? 

नुकत्याच झालेल्या गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL सामन्यात खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि शुभमन गिलने आपले पहिले शतक ठोकले. त्यानंतर गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी उत्तम खेळी खेळून गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. परंतु या सामन्यातील आणखी एक घटना इंटरनेटवर व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एक चिअर लिडर तिचा एक हात फ्रॅक्चरमध्ये असतानाही नाचताना दिसत आहे. आता व्हायरल झालेल्या एका फोटोत, सनरायझर्स हैदराबादची चिअर लिडर तिच्या एका हाताला इजा झाली असताना देखील स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. हा फोटो ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर, अगदी कमी वेळात या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अत्यंत कमी वेळात या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला दिसत आहे.  

भारतातली पहिली महिला सुमो पहिलवान कोण? सुमो दीदी हेतलची जगाला हिमतीने भिडण्याची कहाणी...

गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण...

नेटकरी कमेंट्समध्ये म्हणत आहेत... 

आपला हात फ्रॅक्चरमध्ये असताना देखील ही चिअर लिडर स्टेजवर नाचताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी म्हणत आहेत की, हे 'समर्पण आहे की बंधन' ? तिचा हात फ्रॅक्चरमध्ये असताना देखील तिला स्टेजवर परफॉर्म करायला लावले म्हणून काहींनी बीसीसीआय आणि आयपीएलवर टीका केली आहे. तिचा हात फ्रॅक्चरमध्ये असताना देखील ती तिचे काम उत्तमरीत्या करत आहे, अशी कमेंट एका नेटकाऱ्याने केली आहे. तसेच दुसऱ्या एका वापरकर्त्याने हे माणुसकीच्या विरोधात आहे, असे म्हणत बीसीसीआय आणि आयपीएल वर राग व्यक्त केला आहे. काही नेटकर्यांनी या चिअर लिडर गर्लबद्दल सहानुभूती दर्शवली आणि तिच्या कामासाठी तिच्या समर्पणाबद्दल तिचे कौतुक केल्याचे दिसून येत आहे.

'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

Web Title: Cheerleader dances with broken hand during GT vs SRH clash, pic goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.