Lokmat Sakhi >Social Viral > छावा रिलिज झाला आणि पुन्हा एकदा ‘सांबार’ चर्चेत, दक्षिणेतल्या स्वादिष्ट सांबारची व्हायरल चर्चा

छावा रिलिज झाला आणि पुन्हा एकदा ‘सांबार’ चर्चेत, दक्षिणेतल्या स्वादिष्ट सांबारची व्हायरल चर्चा

chhava movie release: sambar recipe trend: chhatrpati sambhaji maharaj: south Indian food: Sambar Named After Chhatrapati Sambhaji Maharaj: Was sambar invented by Sambhaji Maharaj: सांबार आवडतंच साऱ्यांना, पण त्याच्याभोवतीही वाद आहेतच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 08:05 IST2025-02-15T08:00:00+5:302025-02-15T08:05:01+5:30

chhava movie release: sambar recipe trend: chhatrpati sambhaji maharaj: south Indian food: Sambar Named After Chhatrapati Sambhaji Maharaj: Was sambar invented by Sambhaji Maharaj: सांबार आवडतंच साऱ्यांना, पण त्याच्याभोवतीही वाद आहेतच.

Chhava movie released and once again ‘Sambar’ recipe viral discussion Chhatrapati sambhaji maharaj decoding south Indian food | छावा रिलिज झाला आणि पुन्हा एकदा ‘सांबार’ चर्चेत, दक्षिणेतल्या स्वादिष्ट सांबारची व्हायरल चर्चा

छावा रिलिज झाला आणि पुन्हा एकदा ‘सांबार’ चर्चेत, दक्षिणेतल्या स्वादिष्ट सांबारची व्हायरल चर्चा

सकाळच्या नाश्त्यात हेल्दी काही खायचं असेल तर इडली-डोशाचा पर्याय हमखास सुचवला जातो. त्यातही चर्चा असते सांबारची. ती चवच अप्रतिम. 
दक्षिण भारतात सांबारला खाद्यपदार्थांचा राजा म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. (chhava movie release)सांबारशिवाय इडली आणि डोश्याची चव अपूर्णच आहे. परंतु, सांबार या पदार्थाला नेमकं नाव मिळालं कुठून याबाबत बरेच वाद आहेत. (chhatrpati sambhaji maharaj) याबाबतच्या अनेक कथा देखील प्रसिद्ध आहेत. याबाबत असाही समज आहे की, सांबारचा संबंध छत्रपती संभाजी महाराजांशी आहे. आता छावा सिनेमा रिलिज झाल्यानंतर पुन्हा सांबार आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंबंधीच्या कथा व्हायरल आहेत.
पण तसं खरंच आहे का?

काही कथा असं सांगतात की, दक्षिण भारतात तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर असणारे तंजावूर राज्य शहाजी राजांनी जिंकलं होतं. त्यानंतर ही जाहागिरी व्यंकोजी राजेंना मिळाली. व्यंकोजी राजे हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. (Sambar Named After Chhatrapati Sambhaji Maharaj) ज्यांनी मराठी सत्तेचा दक्षिणेत विस्तार केला होता,असं इतिहासात म्हटलं आहे. संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांनी कर्नाटकाची मोहीम हाती घेतली. यावेळी आपल्या भावाला भेटण्यासाठी महाराजांनी तंजावूरला प्रस्थान केलं. तंजावूरमध्ये व्यंकोजींचे पुत्र शाहूराजे गादीवर बसले होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या मेजवाणीसाठी शाही सोहळा आखला होता. संभाजी राजांना डाळीची आमटी आवडते म्हणून त्यांनी ती बनवायची ठरवली. फोडणी देताना त्यांच्या लक्षात आले की, आमटीसाठी लागणारं आमसूल संपलं आहे. चिंचेचा कोळ वापरुन पदार्थ केला. हा पदार्थ संभाजी महाराजांसाठी बनवला असल्यामुळे त्याला सांबार असे नाव देण्यात आलं. अर्थात त्याबाबत अद्याप कुठेही ठोस पुरावा सापडलेला नाही.
सांबार दक्षिण भारतात विविध प्रयोगातून तयार झाला, त्यावर एकच एक शिक्का नाही असेही मानले जाते.
तर परफेक्ट साऊथ इंडियन सांबार कसं कराल?
ही पाहा कृती..

साहित्य 

  • तेल - १ चमचा 
  • जीरे - १/२ चमचा
  • मेथी दाणे - १/२ चमचा
  • चनाडाळ - १ चमचा  
  • धणे - १ चमचा 
  • तांदूळ - १ चमचा 
  • ओले किंवा सुके खोबरे 
  • हिरवी वेलची - २
  • लवंग -३ 
  • लाल सुक्या मिरच्या - ७ ते ८
  • उभा चिरलेला कांदा - १ 
  • हिंग - १/४चमचा
  • हळद - १/२ चमचा
  • काश्मिरी लाल तिखट - २ चमचे 
  • कडीपत्ता - ७ ते ८ 
  • तूरडाळ - अर्धा कप
  • तेल - २ ते ३ चमचे
  • बारीक चिरलेला टोमॅटो - १
  • बटाटा - अर्धा कप
  • शेवगा - ७ ते ८ तुकडे
  • दुधी - १ कप
  • मीठ चवीनुसार

 

फोडणीसाठी

  • तेल - १ चमचा 
  • मोहरी - १ चमचा 
  • हिंग - १ चमचा 
  • कडीपत्ता - ७ ते ८ पाने

 

https://youtu.be/wITCFQhxIEI?feature=shared

कृती 

  • सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ धुवून त्यात ग्लासभर पाणी घालून भिजत ठेवा. त्यानंतर कढई गरम करुन त्यात तेल, जीर, मेथी दाणे, चण्याची डाळ, धणे, तांदूळ, सुक्या खोबऱ्याचे तुकडे , लवंग , हिरवी वेलची, लसूण, आलं घालून मंद आचेवर परतून घ्या.
  • त्यानंतर मसाल्यात कडीपत्त्याची पाने, लाल सुक्या मिरच्या घालून परतून घ्या. नंतर यात उभा चिरलेला कांदा घालून मिश्रण मंद आचेवर भाजून घ्या. त्यात हिंग, हळद, काश्मिरी लाल तिखट घालून एकजीव करा. तयार मसाला थंड झाल्यानंतर जाडसर वाटून पेस्ट तयार करा. 
  • गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल घालून बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्या. त्यात बटाटा, शेवगाच्या शेंग, दुधी घालून परता. यामध्ये तयार मसाला घालून रंगबदलेपर्यंत शिजवून घ्या. 
  • यात भिजवलेली डाळ घालून ३ कप पाणी घाला. चवीपुरता मीठ घालून उकळून काढून घ्या. त्यानंतर कुकरच्या ४ शिट्ट्या काढून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. यानंतर वरुन मोहरी, हिंग, लाल मिरच्या आणि कडीपत्त्याची फोडणी द्या. तयार होईल आंबट-गोड सांबार...
     

Web Title: Chhava movie released and once again ‘Sambar’ recipe viral discussion Chhatrapati sambhaji maharaj decoding south Indian food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.