लहान मुले ही देवाघरची फुले असतात. असे म्हटले जाते, आणि खऱ्या अर्थाने त्यांचे झऱ्यातील पाण्यासारखे निर्मळ मन असते. बऱ्याचदा त्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद ठरते. काही मुलं वयाने लहान असतात. पण परिस्थिती किंवा त्यांच्या स्वभावामुळे त्यांना वेळेच्या आधी शहाणपण येते, किंवा ते स्वतःचा कमी घरच्यांचा आणि इतरांचा आधी विचार करू लागतात.
अशाच एका लहानग्याची कहाणी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे (Social Viral). ज्यात एका चिमुकल्याने स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेतून एका खास व्यक्तीस गिफ्ट दिले आहे. ती खास व्यक्ती नक्की कोण? त्या व्यक्तीस या चिमुकल्याने नक्की काय गिफ्ट दिले?(Child Uses Tournament Money To Gift A Phone Worth ₹ 2000 To Cook, Viral Post Melts Hearts).
AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित
बॅडमिंटन स्पर्धेत मिळाल्या रकमेतून दिले खास व्यक्तीस भेट
Ankit has so far earned 7K by playing weekend tournaments. And today he got our Cook Saroja a mobile phone for 2K from his winnings. She has been taking care of him from when he was 6 Months. As parents @meerabalaji3107 and I can’t be more happier. pic.twitter.com/8tVeWdxyRh
— V. Balaji (@cricketbalaji1) December 13, 2023
अंकित नावाच्या चिमुकल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात होत आहे. या लहान मुलाला बॅडमिंटन स्पर्धेत सात हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. पण, या बक्षिसातून मिळालेल्या रकमेचा गैरवापर किंवा स्वतःवर खर्च न करता, त्याने एका खास व्यक्तीस गिफ्ट दिले आहे. अंकितने बक्षीस मिळाल्या रकमेतून २ हजाराचा मोबाईल फोन घेतला, आणि हा मोबाईल फोन त्याने गिफ्ट म्हणून घरी स्वयंपाक बनवण्याचे काम करणाऱ्या महिलेला दिला. खेळणी खेळण्याच्या वयात त्याने मोबाईल फोन भेट म्हणून घरकाम करणाऱ्या महिलेला दिला. त्यामुळे श्रीमंत मनाच्या या चिमुकल्याचे कौतुक सध्या नेटकरी करत आहेत.
वडिलांनी केले कौतुक-पोस्ट व्हायरल
अंकितच्या वडिलांनी यासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. त्यांनी अंकित आणि घरकाम करणाऱ्या महिलेचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अंकितला बॅडमिंटन स्पर्धेत सात हजार रुपये बक्षीस देण्यात आले. त्याने या पैश्यांपासून आमच्या घरी जेवण करणाऱ्या सरोजा यांना २ हजार रुपयांचा मोबाईल फोन गिफ्ट म्हणून दिले. अंकित सहा महिन्यांचा असल्यापासून सरोजा त्याची काळजी घेत आले आहेत. अंकितचे पालक म्हणून मी आणि माझी पत्नी खूप खुश आहोत.' सध्या या पोस्टवर नेटकरी चिमुकल्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.