Join us

कोण म्हणतं फक्त माणसंच कपडे धुतात?; व्हायरल होतोय कपडे धुणाऱ्या चिंपांझीचा भन्नाट व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:34 IST

Chimpanzee washes clothes in desi style like humans : सगळ्यात आधी चिंपांझी पिवळ्या शर्टाला साबण लावतो आणि नंतर हाताने धुतो.

चिंपांझी आपल्या खोडकर कृत्यांमुळे खूप लोकप्रिय प्राणी मानले जातात. मग ते माणसांसारखे चालणं असो किंवा फोनवर बोलणं असतो. पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका चिपांझीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  आतापर्यंत तुम्ही बायकांना, माणसांना कपडे धुताना पाहिलं असेल. पण चिंपाझीला कपडे धुताना कधी पाहिलंय का? या व्हिडीओमध्ये तुम्हाला चिपांझी कपडे धुताना दिसून येतोय.

हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ प्राणीसंग्रहालयाचा आहे. सगळ्यात आधी चिंपांझी पिवळ्या शर्टाला साबण लावतो आणि नंतर हाताने धुतो. कापडावरील डाग साफ करण्यासाठी तो ब्रशने घासतो. ही क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली, जी पाहून सोशल मीडिया युजर्स भडकले.

चिंपांझी हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 3000 हून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत आणि क्लिप व्हायरल झाली. माकड कपडे धुताना दिसण्याची ही पहिली वेळ नाही. हे प्राणीसंग्रहालय कुठलं आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 

याआधी चीनमधील चिंपांझीही प्राणीसंग्रहालयात कपडे धुताना दिसला होता. या चिंपांझीचे नाव युहुई असे सांगितले गेले. जो माणसांप्रमाणे कपडे धुवायचा. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या एका सरकारी शाळेच्या प्राचार्यांच्या कार्यालयात एक खोडकर माकड खुर्चीवर बसलं होतं. माकडांचा कळप एका सरकारी शाळेत शिरला होता आणि एक माकड उडी मारून मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसला होता. हा व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाला होता. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया