चीन हा एक असा देश आहे, जो आपल्या विचित्र कायद्यांसाठी ओळखला जातो. तेथील कायदे, प्रॉडक्ट्स, खाद्यसंस्कृती फारच वेगळी आहे. चीनमध्ये सध्या एक आगळावेगळा ट्रेण्ड चर्चेत आहे. महिलांना पाठींबा दर्शवण्यासाठी काही पुरुष स्त्रियांची अंतर्वस्त्र परिधान करून आपला निषेध नोंदवत आहेत. त्याचं कारण एक कायदा. महिला मॉडेल्सला इनर वेअर्सच्या ऑनलाइन जाहिराती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे(China Banned Woman From Modelling Lingerie, So Men Are Doing This).
चीनमधल्या एका कायद्याची जगभरात चर्चा होत आहे. ज्यात फिमेल अंडरगारमेंट्स विकणाऱ्या कंपनींवर, महिला मॉडेल्सला घेऊन जाहिरात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचा निषेध म्हणून, चीनी लाइव्हस्ट्रीम फॅशन कंपन्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये, पुरुष मॉडेल्सला घेऊन महिला अंतर्वस्त्रांची जाहिरात केली आहे.
सांगा, माझी उंची किती असेल? असं तरुणीने ट्विटरवर विचारलं आणि एकाने उत्तर देत सांगितलं..
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, पुरुष मॉडेल्स विविध प्रकारचे अंतर्वस्त्र परिधान करताना दिसत आहेत. न्यू यॉर्क पोस्टनुसार, चीनने महिला मॉडेल्सला अंतर्वस्त्रांच्या जाहीराती करण्याविरुद्ध कायदा आणला आहे, ज्यात कोणतीही महिला अंतर्वस्त्र परिधान करून जाहिरात करू शकत नाही. या बंदीनंतर येथील काही कंपन्यांनी जाहिरातीसाठी पुरुष मॉडेल्सची निवड केली. म्हणून पुरुष टाईट-फिटिंग अंडरगारमेंट्स आणि रिबनसह, नाइटगाऊन घालून जाहिरातीत झळकले.
अय्या, ड्रेस रंग बदलतोय! लाईट पडताच ड्रेसचा कलर चेंज, पाहा फॅशन का जलवा..
चीनच्या डॉयिन या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर, पुरुष मॉडेल्सचे हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लोकांनी या निषेधाचे कौतुक तर केलेच पण असा अभिनव निषेध किती प्रभावी असू शकतो याचे हे उदाहरण आहे.