Lokmat Sakhi >Social Viral > १०० किलो वजन कमी झटक्या कमी करायला निघाली, पण वाट्याला आला दुर्देवी मृत्यू कारण...

१०० किलो वजन कमी झटक्या कमी करायला निघाली, पण वाट्याला आला दुर्देवी मृत्यू कारण...

Chinese Social Media Influencer Dies while loosing 100 kg Weight : आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या गोष्टी करुन वजन कमी करण्याचा अट्टाहास करणे आपल्या अंगलट येऊ शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2023 03:04 PM2023-06-18T15:04:10+5:302023-06-19T17:33:31+5:30

Chinese Social Media Influencer Dies while loosing 100 kg Weight : आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या गोष्टी करुन वजन कमी करण्याचा अट्टाहास करणे आपल्या अंगलट येऊ शकते.

Chinese Social Media Influencer Dies while loosing 100 kg Weight : Losing 100 kg weight is expensive; China's Social Media Influencer Dies... | १०० किलो वजन कमी झटक्या कमी करायला निघाली, पण वाट्याला आला दुर्देवी मृत्यू कारण...

१०० किलो वजन कमी झटक्या कमी करायला निघाली, पण वाट्याला आला दुर्देवी मृत्यू कारण...

वजन कमी करणे ही अनेकांसाठी आत्मसन्मानाची बाब असते. वजन जास्त असेल तर आपण इतरांमध्ये वेगळे दिसू, सगळे आपल्याला जाड म्हणतील, आपल्याला फॅशनेबल कपडे घालता येणार नाहीत या गोष्टींसाठी वजन कमी करण्याचे वेड अनेकांना लागले आहे. जास्तीचे वजन कमी करणे, त्यासाठी योग्य तो आहार आणि व्यायाम करणे हे ठिक आहे. मात्र वजन कमी करण्याच्या नादात आरोग्याची हेळसांड करणे योग्य नाही. भविष्यात आपल्याला आरोग्याच्या तक्रारी भेडसावू नयेत म्हणून वजन कमी करणे एकवेळ ठिक आहे. पण केवळ दिसण्यासाठी किंवा लोक काय म्हणतील म्हणून आपल्या आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या गोष्टी करुन वजन कमी करण्याचा अट्टाहास करणे आपल्या अंगलट येऊ शकते. चीनमधील एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने वजन कमी करण्याचा बांधलेला चंग तिला खूपच महागात पडला. १०० किलो वजन कमी करण्याच्या नादात तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे (Chinese Social Media Influencer Dies while loosing 100 kg Weight) . 

(Image : Google)
(Image : Google)

अवघ्या २१ वर्षांच्या कुइहुआला १०० किलो वजन कमी करायचे होते. २ महिन्यात तिचे २५ किलो वजन कमी झालेही होते. अशाप्रकारे वजन कमी करुन तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर एक उत्तम उदाहरण निर्माण करायचे होते. तिचे वजन १५६ किलो होते, यातील १०० किलो कमी करुन तिला ५६ किलोंचे व्हायचे होते. यासाठी तिने एक फिटनेस कँप जॉईन केला होता. याठिकाणी ती मोठ्या प्रमाणात वर्कआऊट करत होती. इतकेच नाही तर वजन कमी करायचे म्हणून तिने खाणे-पिणेही सोडले होते असे सांगितले जाते. हेच तिच्या मृत्यूमागचे सर्वात महत्त्वाचे कारण समजले जाते. अशाप्रकारे वजन कमी करणे व्यक्तीच्या जीवावर बेतणारे असल्याने अनेकांनी अशाप्रकारच्या कँपबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

अशाप्रकारच्या कँपमध्ये लोकांचे आरोग्य आणि जीवन या दोन्हीशी खेळ केला जात असल्याने अशा कँपपासून प्रत्येकाने दूर राहायला हवे असे सगळ्यांचे म्हणणे आहे. कुइहुआला फॉलो करुन अशाप्रकारे कोणी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी तो सोडून द्यावा, कारण आमच्यासोबत झाले ते तुमच्यासोबत होऊ नये असे आम्हाला वाटते असे कुइहुआ हिच्या आईने म्हटले आहे. त्यामुळे वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीही काही अशास्त्रीय आणि प्रमाणाबाहेर जास्त प्रयत्न करत असाल तर ते जीवावर बेतणारे ठरु शकते हे वेळीच लक्षात घ्या. कारण वजन कमी करणे योग्य असून त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घेऊनच अशा गोष्टी करायला हव्यात अन्यथा त्याचा त्रास होण्याचीच शक्यता जास्त असते. 

Web Title: Chinese Social Media Influencer Dies while loosing 100 kg Weight : Losing 100 kg weight is expensive; China's Social Media Influencer Dies...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.